Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कपूरसोबतच्या लिपलॉक सीनने उडवली होती खळबळ, आता 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री करणार 'ही' बोल्ड अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 18:24 IST

'बिग बॉस 18' ची चर्चा सुरू झाली आहे

Bigg Boss Season 18 : वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस'चा प्रत्येक सीझन कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.  यावेळी 'बिग बॉस ओटीटी 3' सर्वाधिक चर्चेत राहिला. हा शो संपताच आता 'बिग बॉस 18' ची चर्चा सुरू झाली आहे.  'बिग बॉस'मध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची नावेही समोर येत आहेत. यातच आता एका अभिनेत्रीचं नाव  समोर आलं आहे,  जिने अनिल कपूरसोबत (Anil Kapoor) लिपलॉक सीन देत खळबळ उडवून दिली होती. 

'बिग बॉस १८'मध्ये सहभागी होणार अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नाही तर समीरा रेड्डी (Sameera Reddy) आहे.  मुसाफिर (Musafir ) या चित्रपटात समीरा रेड्डीने अनिल कपूरसोबत किसिंग सीन दिला होता. या सीनची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. मीराने दिवंगत गायक पंकज उधास यांच्या 'और आहिस्ता' अल्बममधून पदार्पण केलं होतं. हे गाणं तेव्हा खूप गाजलं होतं. यानंतर तिने  अनेक सिनेमात काम केलं आहे. ती सोहेल खानसोबत 'मैंने दिल तुझको दिया'मध्ये दिसली होती. डरना मना है, नो एंट्री,प्लान, टॅक्सी नंबर 9 2 11, दे दना दन आणि  रेस  यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये समीरा झळकली.

समीराने  2014 मध्ये मराठमोळ्या बिझनेसमन अक्षय वर्देसोबत लग्न केलं. लग्न झाल्यावर तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. समीरा आणि अक्षय यांची पहिली भेट एका अ‍ॅड शूटच्या दरम्यान झाली होती. त्यानंतर दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मराठमोळ्या पद्धतीने समीरा आणि अक्षयने लग्नगाठ बांधली. 

गेल्या कित्येक वर्षांपासून समीराचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.सध्या ती तिच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत तिचा वेळ घालवतांना दिसते. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. ती आणि तिच्या सासूबाई दोघी मिळून एक कुकिंग पेजही चालवतात. त्यामुळे ती सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असते.  'बिग बॉस'घरात सहभागी होण्याबद्दल अद्याप तिने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.  

टॅग्स :समीरा रेड्डीसेलिब्रिटीबॉलिवूडबिग बॉससलमान खान