Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मुन्नाभाई MBBS'मधली चिंकी आठवतेय का? आता कशी दिसते बघा, ओळखताही येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:53 IST

इतक्या वर्षांपासून गायब असलेली ग्रेसी नुकतीच बॉलिवूडमधल्या एका विवाहसोहळ्यात दिसली.

'मुन्नाभाई MBBS' हा संजय दत्तच्या काही गाजलेल्या आणि सुपरहिट ठरलेल्या सिनेमांपैकी एक आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मुन्नाभाई आणि सर्किटची सिनेमातील जोडी हिट ठरली होती. या सिनेमात दाखवलेली मुन्नाभाईची बालपणीची मैत्रीण तुम्हाला आठवतेय का? 'मुन्नाभाई MBBS'मध्ये  चिंकी म्हणजेच डॉ. सुमणची भूमिका अभिनेत्री ग्रेसी सिंग हिने साकारली होती. छोट्याशा भूमिकेतही ग्रेसी भाव खाऊन गेली होती. 

ग्रेसीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण, सध्या मात्र ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. आमिर खानच्या लगान सिनेमामुळे तिला प्रसिद्धी मिळाली होती. या सिनेमात तिने गौरीची भूमिका साकारली होती. बॉलिवूडसोबतच काही साऊथ सिनेमांमध्येही ती दिसली होती. घर जमाई, संतोषी माता, अमानत यांसारख्या मालिकांमध्येही ग्रेसीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. इतक्या वर्षांपासून गायब असलेली ग्रेसी नुकतीच बॉलिवूडमधल्या एका विवाहसोहळ्यात दिसली. 

प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा लेक कोनार्क गोवारीकर याचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. कोनार्कने  नियती कनाकियाशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाहसोहळ्याला अख्खं बॉलिवूड अवतरलं होतं. ग्रेसीने देखील या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. लेहेंगा परिधान करून ग्लॅमरस लूकमध्ये ग्रेसी या लग्नासाठी हजर होती. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन ग्रेसीचा विवाहसोहळ्यातील व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती पापाराझींना पोझ देताना दिसत आहे.

इतक्या वर्षांत ग्रेसी सिंगमध्ये प्रचंड बदल झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला ओळखणंही कठीण झालं आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. 

टॅग्स :ग्रेसी सिंगटिव्ही कलाकार