Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विमानतळ अधिकाऱ्याने शाहरुख खानला अडवलं, मग घडलं असं काही...व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 13:37 IST

शाहरुख खानला सुरक्षा अधिकाऱ्याने अडवलं आणि तो त्याला काय म्हणाला?

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचामुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय. यामध्ये शाहरुख खान आपल्या कारमधून उतरून विमानतळाच्या आत जाताना दिसत आहे. मात्र सुरक्षा तपासणीदरम्यान असं काही घडलं ज्यामुळे चाहत्यांच्या नजरा व्हिडीओवरच खिळल्या. शाहरुख खानला सुरक्षा अधिकाऱ्याने अडवलं आणि तो त्याला काय म्हणाला? बघा

नेमकं काय घडलं?शाहरुख खान काल मुंबई विमानतळावर पोहोचला. तो दुबईला जाण्यासाठी निघत होता. शाहरुखने यावेळी व्हाईट टीशर्ट, ब्लू जीन्स आणि ब्लू जॅकेट परिधान केले होते. यासोबत त्याने कानटोपी घातली होती आणि डोळ्यावर गॉगल होता. जसा तो गेटजवळ पोहोचला तेव्हा विमानतळ अधिकाऱ्याने त्याचा आधी पासपोर्ट बघितला. मग अधिकाऱ्याने हसतच शाहरुखला गॉगल काढायला सांगितलं. शाहरुखनेही गॉगल काढला. अधिकाऱ्याने पासपोर्टवरचा फोटो पाहिला आणि मग पुन्हा शाहरुखकडे पाहिले. शाहरुख त्याला कौतुकाने काहीतरी म्हणाला ज्यावर अधिकारी हसताना दिसला. तसंच किंग खानने हसतच अधिकाऱ्याच्या खांद्यावर मित्रासारखा हात मारला आणि त्याचा निरोप घेतला. 

व्हिडीओ पाहू सोशल मीडियावर चाहते कमेंट्स करत आहेत. "किंग खान स्वीटहार्ट आहे','तो सुरक्षारक्षक त्याची ड्युटी करतोय, यात चूक काहीच नाही'. तर काही नेटकऱ्यांनी गंमतीत म्हटले, 'मार्केटमध्ये शाहरुखचे बरेच ड्युप्लिकेट आले आहेत'. 

शाहरुख खानला दुबईत एक महत्वाचा अवॉर्ड मिळणार आहे त्यासाठीच तो काल रवाना झाला. सध्या शाहरुख आगामी 'किंग' सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात सिनेमा रिलीज होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shah Rukh Khan stopped at Mumbai airport; Viral video surfaces.

Web Summary : A video shows Shah Rukh Khan at Mumbai airport being asked to remove his glasses by a security officer. The actor complied, shared a laugh, and proceeded, with the video going viral. He was traveling to Dubai for an award.
टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडमुंबई विमानतळसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओ