Join us

"'एक मिशन, दोन फायटर..." धोनी-माधवचा मोठा धमाका! ॲक्शन टीझर पाहून चाहते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 15:28 IST

नुकत्याच आर. माधवनसोबतच्या एका टीझरमध्ये धोनीचा ॲक्शन अवतार पाहून चाहते थक्क झाले.

Ms Dhoni  With R Madhavan: भारताचा 'कॅप्टन कूल' अशी ओळख असलेला क्रिकेटपटू म्हणजे महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni). क्रिकेटपटू म्हणून धोनी जबरदस्त तर आहेच. पण, त्याचं अभिनयकौशल्य देखील तितकेच कमाल आहे. धोनी फक्त मैदानावरच नाही, तर कॅमेऱ्यासमोरही लोकांना प्रभावित करून जातो. महेंद्रसिंग धोनी आता क्रिकेटच्या मैदानानंतर थेट अभिनयाच्या जगात आपली नवी इनिंग सुरू करणार असल्याचं दिसतंय. अभिनेता आर. माधवनसोबतचा (R. Madhavan) त्याचा एक धमाकेदार टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या टीझरने धोनीच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

आर. माधवनने हा टीझर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. 'द चेस' (The Chase) असे या प्रोजेक्टचे नाव आहे. यामध्ये धोनी आणि माधवन दोघेही काळ्या कपड्यांमध्ये आणि बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये दिसत आहेत.  या टीझरमध्ये ते बंदुक चालवतानाही दिसत आहे. टीझरच्या कॅप्शनमध्ये माधवनने लिहिलंय की, "एक मिशन, दोन फायटर. सज्ज व्हा- एक अफाट आणि थरारक पाठलाग सुरू होतोय. द चेस - टीझर आला आहे. दिग्दर्शक वसन बाला. लवकरच...".

आर. माधवनच्या या पोस्टवर चाहत्यांनी धडाधड कमेंट केल्यात. अनेकांनी धोनी हा खरंच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय का, असे प्रश्न केलेत. हा टीझर पाहून चाहते गोंधळून गेले आहेत. कारण, हा टीझर एखाद्या चित्रपटाचा आहे की वेब सीरिजचा, की फक्त व्यावसायिक जाहिरात आहे, याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. धोनीच्या चाहत्यांना आता या प्रोजेक्टबद्दलची आधिक माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआर.माधवनबॉलिवूड