Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी काम मागण्यासाठी दिग्दर्शकांना फोन करायचे...", मराठी अभिनेत्रीचा खुलासा; आदित्य धरलाही विचारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:44 IST

मला काम मागायला लाज वाटत नाही..., कोण आहे ही अभिनेत्री?

अभिनेत्री मृणाल ठाकुर आज हिंदी आणि साउथ इंडस्ट्रीत सक्रीय आहे.  २०१२ साली 'मुझे कुछ कहती है ये खामोशियाँ' मधून तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत परदार्पण केलं होतं. तर २०१९ साली तिला पहिला हिंदी सिनेमा मिळाला. हृतिक रोशनसोबत ती 'सुपर ३०'मध्ये दिसली. त्याआधी २०१४ साली तिचा पहिला मराठी सिनेमा 'हॅलो नंदन'आला होता. पण मृणालला या संधी सहजासहजी मिळाल्या नाहीत. तिला काम मागत फिरावं लागलं. अनेक निर्माते, दिग्दर्शकांना तिने कामासाठी अप्रोच केलं. त्यात 'धुरंधर' फेम आदित्य धरकडेही तिने काम मागितलं होतं असा खुलासा केला.

न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत मृणाल ठाकुर म्हणाली, "या संधी सहजासहजी माझ्याकडे चालून आल्या नाहीत. मला त्या मिळवाव्या लागल्या. मला त्यांचा पाठलाग करावा लागला. मी दिग्दर्शकांना मध्ये मध्ये माझा चेहरा तरी दाखवत जाईन याची मी खबरदारी घेतली. 'सर, मी आहे. कधीतरी मलाही कास्ट करा प्लीज' असं मी दिग्दर्शकांसमोर जाऊन बोलायचे. काम मागायला मला अजिबात लाज वाटत नाही."

यावेळी मृणालने 'धुरंधर'चा दिग्दर्शक आदित्य धरलाही भेटल्याचा किस्सा सांगितला. ती म्हणाली, "आदित्य धर हा पहिलाच दिग्दर्शक आहे ज्याच्याकडे मी काम मागितलं होतं. 'धुरंधर' रिलीजनंतर मी त्याला फोन करुन ती गोष्ट सांगितली. मला तो दिवस आजही आठवतो असंही त्याला सांगितलं. काम कसं मागायचं असतं हे मला माहित नव्हतं."

मृणालने श्रीदेवी यांचा मॉम सिनेमा पाहून दिग्दर्शक रवी उद्यवार यांना फोन केला होता. मलाही तुमच्यासोबत काम करायचं आहे असं तिने सांगितलं होतं. आता त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या 'दो दीवाने शहर मे' सिनेमात मृणाल मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mrunal Thakur: I used to call directors for work.

Web Summary : Mrunal Thakur revealed she actively sought roles, even calling directors like Aditya Dhar after 'Dhurandhar' release. She wasn't shy about asking for opportunities, a strategy that ultimately led to roles in both Hindi and South Indian cinema.
टॅग्स :मृणाल ठाकूरधुरंधर सिनेमामराठी अभिनेताबॉलिवूड