Join us
Daily Top 2Weekly Top 5

धनुषशी अफेअरच्या चर्चा, आता लग्नासाठी पालकांचा दबाव? मृणाल ठाकूर म्हणाली "माझे बाबा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 14:08 IST

३३ वर्षीय मृणालने 'अरेंज मॅरेज' या संकल्पनेवर भाष्य करत, लग्नासाठी तिच्या पालकांकडून तिच्यावर नक्की किती दबाव आहे, याचा खुलासा केला आहे.

Mrunal Thakur Marriage : अभिनेत्री मृणाल ठाकुर सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. पहिलं कारण म्हणजे आज प्रदर्शित झालेला तिचा 'दो दिवाने सहर में'हा चित्रपट आणि दुसरं कारण म्हणजे साऊथ स्टार धनुषसोबतच्या अफेअरच्या चर्चा. मृणालने धनुष हा फक्त एक चांगला मित्र असल्याचं सांगितलं होतं. अशातच आता ३३ वर्षीय मृणालने 'अरेंज मॅरेज' या संकल्पनेवर भाष्य करत, लग्नासाठी तिच्या पालकांकडून तिच्यावर नक्की किती दबाव आहे, याचा खुलासा केला आहे.

'News18' शोशाशी संवाद साधताना मृणाल म्हणाली की, "घरात आता रोजच लग्नाचा विषय निघतो. हे खरंच डे-ड्रीमिंगसारखं आहे. आई-वडिलांच्या मनात नेहमीच मुलांच्या लग्नाचे सनई-चौघडे वाजत असतात", असं ती हसत म्हणाली.

अलीकडचा एक किस्सा सांगताना मृणाल म्हणाली, "काल रात्री माझे बाबा मला म्हणाले की, आता तू आयुष्यात सेटल व्हायला हवं. त्यावर मी त्यांनाच उत्तर दिलं की, तुम्हीच तुमच्या बहिणींना फोन करून एखादा चांगला मुलगा आहे का ते का विचारत नाही?" यावर तिच्या वडिलांनी जेव्हा विचारले की, "मुलगा कुठे आहे?", तेव्हा मृणालने हसत त्यांनाच प्रतिप्रश्न केला, "नेमकं हेच तर मला तुम्हाला विचारायचं आहे, मुलगा कुठे आहे?  जर तुम्हीच मला हा प्रश्न विचारत असाल, तर मी काय सांगणार". मृणालच्या मते, ही सध्या प्रत्येक घरातील परिस्थिती आहे.

मृणालला अरेंज्ड मॅरेजची अजिबात भीती वाटत नाही, मात्र सध्या तिला हवा तसा जोडीदार सापडत नसल्याची खंत तिने व्यक्त केली. मृणाल म्हणाली, "लग्न फक्त नावापुरतं नसावं. पूर्वी अरेंज्ड मॅरेजमध्ये पालक ओळख करून देत असत. आता मित्रमैत्रिणीही ओळख करून देतात, तेही एका प्रकारचं अरेंजमेंटच आहे. शेवटी लव्ह असो किंवा अरेंज्ड, दोन व्यक्ती एकमेकांशी जुळल्या तरच नातं टिकतं. तिच्यासाठी कम्पॅटिबिलिटी ही फक्त जोडप्यापुरती मर्यादित नसून कुटुंबांपर्यंत जाते. लग्न हे दोन व्यक्तींचंच नव्हे, तर दोन कुटुंबांचं मिलन असतं", असं तिने स्पष्ट केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Mrunal Thakur discusses marriage pressure and her father's matchmaking efforts.

Web Summary : Mrunal Thakur addresses rumors of an affair and discusses the pressure from her parents regarding marriage. She humorously recounts a conversation with her father about finding a suitable match, emphasizing compatibility for herself and her family.
टॅग्स :मृणाल ठाकूरलग्नधनुष