Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्याच्यामुळे आज मी..."; रणवीर सिंगबद्दल मृणाल ठाकूरचं मोठं विधान, 'धुरंधर'बद्दल म्हणाली- "हिरोपेक्षा जास्त तो..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 14:04 IST

सध्या अभिनेता रणवीर सिंग 'धुरंधर २' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. रणवीरच्या अभिनेत्याचं सर्वजण कौतुक करत आहेत. अशातच मृणाल ठाकूरने रणवीरविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे

सध्या अभिनेता रणवीर सिंग 'धुरंधर २' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. रणवीरच्या अभिनेत्याचं सर्वजण कौतुक करत आहेत. इंडस्ट्रीतूनही रणवीरच्या भूमिकेची प्रशंसा होतेय. अशातच अभिनेत्री मृणाल ठाकूरनेरणवीर सिंगचं कौतुक केलं आहे. मृणालने रणवीर सिंगसोबतची एक जुनी आठवण जागवली आहे. याशिवाय इंडस्ट्रीत येण्याचं श्रेयही मृणाल ठाकूरने रणवीरला दिलंय. काय म्हणाली मृणाल?

मृणाल ठाकूरने नुकतीच रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रणवीर सिंगचे कौतुक करताना ती म्हणाली, "माझं मन खूप आनंदी झालं आहे. तो माझ्यासाठी 'लकी चार्म' आहे. आज मी या इंडस्ट्रीमध्ये आहे ती फक्त त्याच्यामुळेच. मी त्याच्यासोबत एका हेअर ब्रँडसाठी जाहिरात केली होती आणि जेव्हा ती जाहिरात टीव्हीवर आली, तेव्हाच चित्रपट निर्मात्यांनी माझी दखल घ्यायला सुरुवात केली. मी याचे पूर्ण श्रेय रणवीरला देते. त्याने खरोखरच मला खूप मदत केली आहे. तो एक अतिशय सकारात्मक व्यक्ती असून त्याला प्रत्येक यश मिळायलाच हवे."

https://x.com/sapphiirepixie/status/2041523780317769850/embed

अभिनेत्रीने केलं 'धुरंधर'चं कौतुक'धुरंधर २' मधील रणवीरच्या कामाचे कौतुक करताना ती पुढे म्हणाली, "धुरंधरमधील त्याचा अभिनय केवळ वरवरचा नव्हता, तर त्यात कमालीची खोली होती. मी त्याला रणवीर सिंग म्हणून नाही, तर केवळ 'हमजा' या पात्राच्या रूपात पाहिले. तो हिरोपेक्षा 'हमजा' म्हणून जास्त भावला. मला त्याचा खूप अभिमान वाटतो कारण तो अत्यंत मेहनती आहे. तो जे काही करेल ते ब्लॉकबस्टर ठरो, हीच माझी प्रार्थना आहे. तो काहीही करू शकतो.", अशाप्रकारे मृणालने रणवीरचं कौतुक केलं आहे. मृणालचा आगामी सिनेमा 'डकैत' बद्दल सर्वांना उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mrunal Thakur credits Ranveer Singh for her Bollywood success.

Web Summary : Mrunal Thakur says Ranveer Singh is her lucky charm. She credits him for her entry into Bollywood after they worked together in an ad. She also praised his performance in 'Dhurandhar 2'.
टॅग्स :मृणाल ठाकूररणवीर सिंगधुरंधर सिनेमा