Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हाला खूप दुःख झाले..."; घटस्फोटांच्या चर्चांवर अखेर मौनीने मौन सोडलंच! पतीसह पोस्ट करुन सर्व सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 09:25 IST

अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या. अखेर काल दोघांनी मिळून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या. अखेर काल दोघांनी मिळून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय मौनी रॉयने तिच्या चाहत्यांना या कठीण काळात आपल्या खासगी आयुष्याचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे.

खोट्या अफवांबद्दल व्यक्त केले दुःख

मौनी आणि सूरज यांनी आपल्या निवेदनात लिहिले आहे की, "आमच्या वैवाहिक आयुष्याबद्दल ज्या प्रकारे खोट्या आणि मनाला येईल तशा कथा पसरवल्या गेल्या, त्याचे आम्हाला खूप दुःख झाले आहे. ज्या गोष्टी पसरवल्या जात आहेत त्यात आमच्या दोघांच्या नात्याविषयी काहीच सत्य नाही. आमच्या खासगी आयुष्याला चव्हाट्यावर मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे, जो चुकीचा आहे."


मैत्री कायम ठेवणार

मौनी-सूरजने पुढे नमूद केले की, "बदलत्या आयुष्यातील प्राधान्यक्रमांनुसार आम्ही दोघांनी एकमेकांचा आदर राखून आणि एकमेकांना समजून घेत वेगळ्या आणि स्वतंत्र  वाटेवर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा काळ शांतपणे हाताळण्यावर आमचं लक्ष आहे. आमचे नाते जरी संपले असले, तरी आम्ही भविष्यातही आमची मैत्री जपण्याचा पूर्ण प्रयत्न करू. या कठीण काळात पाठिंबा देणाऱ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो." अशाप्रकारे मौनी आणि सूरजने पोस्ट करुन घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mouni Roy addresses divorce rumors, confirms separation with husband.

Web Summary : Mouni Roy and Suraj Nambiar addressed divorce rumors, confirming their separation via social media. They expressed sadness over false narratives and requested privacy, emphasizing their commitment to maintaining friendship despite the split.
टॅग्स :मौनी राॅयघटस्फोटबॉलिवूडसेलिब्रिटी