Join us

2024 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेत 'हे' भारतीय चित्रपट अन् वेबसिरीज, IMDb कडून यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 16:26 IST

आयएमडीबीने 2024 मधील सर्वाधिक लोकप्रिय टॉप 10 सिनेमे आणि वेबसीरिजची यादी घोषित केली आहे.

Most Popular Indian Movies And Web Series Of 2024 : 2024 हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. आता 2025 ची चाहूल लागली आहे. अशातच मागे वळून पाहता बॉलिवूड, तामिळ, मल्याळम, तेलुगु सिनेमांनी आणि वेबसीरिजने चांगलं यश मिळवलं. हे वर्ष सिनेविश्वासाठी जबरदस्त होतं. 2024 मध्ये कोणत्या 10 सिनेमांनी आणि 10 वेबसिरीजनं प्रेक्षकांचा मनाचा ठाव घेतला, याची यादीच IMDb ने जाहीर केली आहे.

IMDbनुसार 'कल्की 2898-एडी' हा 2024 चा सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट आहे. तर 'हीरामंडी: द डायमंड बाजार' ही 2024 ची सर्वाधिक लोकप्रिय भारतीय वेब सिरीज आहे.  जगभरातील IMDb च्या ग्राहकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे हे ठरवलं जातं.  "IMDb नं जाहीर केलेली ही यादी केवळ वर्षातील आघाडीच्या सिनेमा आणि वेबसीरिजना सेलिब्रेट तर करतेच, पण दर्शक कशाला प्राधान्य देतात, ह्याबद्दलसुद्धा म्हत्त्वाची माहिती देते", असं IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया यांनी म्हटलं. 

 'कल्की 2898-एडी' चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांनी म्हटलं की, "IMDb च्या 2024 च्या सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये'कल्की 2898-एडी' ला पहिल्या स्थानी पाहिल्यानंतर अतिशय आनंद होतोय. ही मान्यता चित्रपटाला खुल्या हृदयाने आपलेसे करणाऱ्या विलक्षण अशा दर्शकांच्या प्रेम आणि पाठिंब्याचे प्रतिक आहे. या चित्रपटामध्ये आम्ही आमचे सर्वस्व झोकून दिले होते. जगामधील सर्व वयोगटातील चाहत्यांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटलेले बघताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. IMDb आणि हा प्रवास इतका रोमांचक करणाऱ्या सर्व चाहत्यांना मन:पूर्वक धन्यवाद! तुमच्या प्रोत्साहनामुळे आम्हाला कथा सादर करताना मर्यादांच्या पुढे जाण्याची प्रेरणा मिळते".

नेटफ्लिक्स इंडियाच्या सिरीज हेड तान्या बामीनं म्हंटलं, "नेटफ्लिक्सला नेहमीच जगभरामध्ये अभिनव मालिका आणल्याबद्दल ओळखले जाते. आमच्या भारतीय मालिकेला ती मान्यता मिळताना पाहणे, अतिशय आनंददायक आहे. 'हीरामंडी: द डायमंड बाजार'  ही आमची आजवरची सर्वाधिक महत्त्वाकांक्षी ड्रामा सीरिज होती.ती एक उल्लेखनीय सांस्कृतिक मापदंड ठरली. तसेच 'मामला लीगल है' आणि 'द ग्रेट इंडियन कपिल शो'नं  मनोरंजनाची व्याख्या नव्याने निश्चित केली. या सीरिज MDb च्या टॉप 10मध्ये आल्यावरुन भारतीयांच्या रसिकतेमधील वैविध्य व गुणवत्तेची कल्पना येते. आम्ही 2025 मध्ये आणखी उत्साहाने काम करू".

प्राईम व्हिडीओ इंडियाच्या दिग्दर्शक व प्रमुख एसव्हीओडी शिलांगी मुखर्जी यांनी म्हटलं की, "2024 हे आमच्यासाठी एक उल्लेखनीय वर्ष होते. या वर्षात नवीन सीरिजसोबत जुन्या सीरिजचे नवे सीझनही यंदा प्रदर्शित झाले. MDb च्या टॉप 10मध्ये ,  प्राईम व्हिडिओ सीरिज असणे आमच्यासाठी प्रेक्षकांच्या प्रेमाची पावती आहे".

2024 च्या IMDb टॉप 10 सर्वांत लोकप्रिय भारतीय चित्रपटांची यादी

1.    कल्की 2898-एडी (Kalki 2898 AD | Netflix, Prime Video)2.    स्त्री 2: सरकटे का आतंक (Stree 2: Sarkate Ka Aatank | Prime Video)3.    महाराजा (Maharaja | Netflix)4.    शैतान (Shaitaan | Netflix)5.    फायटर (Fighter | Netflix)6.    मंजुमेल बॉयज (Manjummel Boys | Disney+ Hotstar)7.    भूल भुलैया 3 (Bhool Bhulaiyaa 3)8.    किल (Kill | Disney+ Hotstar)9.    सिंघम अगेन (Singham Again)10.    लापता लेडीज (Laapataa Ladies | Netflix)

 

2024 च्या IMDb टॉप 10 सर्वांत लोकप्रिय भारतीय वेब सिरीजची यादी

1.    हीरामंडी: द डायमंड बाजार (Heeramandi: The Diamond Bazaar | Netflix)2.    मिर्झापूर (Mirzapur (Season 3) | Prime Video)3.    पंचायत (Panchayat (Season 3) | Prime Video)4.    ग्यारह ग्यारह (Gyaarah Gyaarah | Zee5)5.    सिटाडेल: हनी बनी (Citadel: Honey Bunny | Prime Video)6.    मामला लीगल है (Maamla Legal Hai | Netflix)7.    ताज़ा खबर (Taaza Khabar (Season 2) | Disney+ Hotstar)8.    मर्डर इन माहिम (Murder in Mahim | JioCinema)9.    शेखर होम (Shekhar Home | JioCinema)10.    द ग्रेट इंडीयन कपिल शो (The Great Indian Kapil Show | Netflix)

टॅग्स :इयर एंडर 2024सिनेमावेबसीरिजप्रभासनेटफ्लिक्स