Join us

नेहा कक्कडचा हा व्हीडीओ 28 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला, काय आहे व्हीडीओमागचं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 21:00 IST

नेहा सुरुवातीला आपल्या भाऊ बहिणीसोबत जागरणमध्ये गायची. गायनातील यशामुळेच नेहा सध्या मुंबईच्या वर्सोवा येथील 3BHK अपार्टमेंटमध्ये राहते.

गायिका नेहा कक्कड बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाल्यामुळे सतत चर्चेत आहे. मात्र आता नेहा कक्कड ब्रेअकपच्या नाही तर आता दुस-याच कारणामुळे चर्चेत आली आहे.  नेहा आता  ब्रेकअपमधून सावरत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता सोशल मीडियावर तिचे काही कॉमेडी अंदाजातले व्हीडीओ शेअर करत आपले आयुष्य जगत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच नेहाने एक व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हीडीओत नेहा डान्स करता करता अचानक घसरल्याचे पाहायला मिळत आहे. यावर केवळ तिचे मित्रच नाही तर ती स्वतःही स्वतःवर हसते आणि स्वतःला सांभाळत उठते. विशेष म्हणजे व्हिडिओला सोशल मीडियावर तीन दिवसांत 28 लाखापेक्षा  अधिक लोकांनी पाहिले आहे. 

नेहाने बॉलीवुमध्ये गायिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे ज्या शोमध्ये ती जज आहे त्याच शोमधून तिने तिच्या करियरची सुरूवात केली होती. याच शोच्या दुसऱ्या सीजन पासून केली होती. जेव्हा नेहा 11वीमध्ये होती. तेव्हा ती कंटेस्टेंट म्हणून या शो मध्ये गेली होती. या शोमध्ये ती त्यावेळी यश मिळवू शकली नाही. तिल रिजेक्ट करण्यात आलं होतं. तरीही ती खचली नाही. मोठ्या मेहनतीने तिने स्वतःची यशस्वी गायिका अशी ओळख निर्माण केली. नेहा आज बॉलिवूडच्या टॉप सिंगर्सपैकी एक आहे. ती गाण्याचे 10 ते 15 लाख रुपये ती मानधन घेते. एखाद्या सिनेमात तिला गाणे कंपोज करण्यासाठी घेतले गेले तर ती दोन ते तीन लाख रुपये महिन्याला घेते. 

4 वर्षांची होती तेव्हापासूनच तिने संगीताचे धडे घेण्यस सुरुवात केली होती. नेहाने तिचा भाऊ टोनी कक्कड आणि बहीण सोनू कक्कड यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. नेहा सुरुवातीला आपल्या भाऊ बहिणीसोबत जागरणमध्ये गायची. गायनातील यशामुळेच नेहा सध्या मुंबईच्या वर्सोवा येथील 3BHK अपार्टमेंटमध्ये राहते. ज्याची किंमत 1.2 कोटी रुपये आहे. नेहाकडे आठ महागड्या आलिशान कार आहेत. काही दिवसांपूर्वीच नेहाने मर्सिडीज खरेदी केली आहे. तिच्या या नवीन कारची किंमत 95.72 लाख आहे. नेहाची संपत्ती 51.80 कोटी एवढी आहे.

टॅग्स :नेहा कक्कर