बॉलिवूडमधील पॉवर पॅक्ड अभिनेता म्हणजे शक्ती कपूर (shakti kapoor). नायकापासून ते खलनायकापर्यंत अनेक धाटणीच्या भूमिका त्यांनी आजवर साकारल्या आहेत. उत्तम अभिनयकौशल्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे शक्ती कपूर सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असतात. सध्या नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या कॉलेजजीवनातील एक किस्सा चर्चिला जात आहे. पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याला एकेकाळी रॅगिंगचा सामना करावा लागला होता.
''विनोद खन्ना यांचे धाकटे बंधू प्रमोद खन्ना आणि राकेश रोशन हे दोघे मला पुणे फिल्म इन्स्टिट्यूला सोडायला आले होते. त्यावेळी माझी ओळख मिथुन चक्रवर्ती (mithun chakraborty) यांच्यासोबत झाली होती. त्यांच्यासोबतचा सुद्धा एक रंजक किस्सा आहे. जसं मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये पाऊल ठेवलं त्यावेळी एक मुलगा एका महागड्या गाडीतून खाली उतरला. त्याने लुंगी नेसली होती. त्याची लुंगी सुद्धा थोडीशी फाटलेलीच होती. त्याचा एकंदरीत लूक पाहून असं वाटलं की कोणीतरी मोठा माणूस आहे. तो आमच्या जवळ आला आणि त्याने राकेश रोशन, प्रमोदजी यांना वाकून नमस्कार केला. पुढे तो म्हणाला, मी या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतो. दुसऱ्या वर्षाला आहे. कोलकात्तावरुन आलोय. मिथुन चक्रवर्ती असं माझं नाव आहे, असं त्याने सांगितलं. त्याला पाहून मी थक्कच झालो'', असं शक्ती कपूर म्हणाले.
पुढे ते म्हणतात, ''मिथुनला पाहून मी म्हणालो, तू सिनिअर आहेस. मी इथे नवखा आहे असं म्हणत मी त्याला बिअर पिण्याची ऑफर दिली. पण त्यावर, मी दारु पित नाही असं उत्तर त्याने दिलं आणि त्याच्यासोबत मी हॉस्टेलच्या रुमकडे जायला निघालो. जसं आम्ही हॉस्टेलवर पोहोचलो. त्याचं रुपच बदललं. मला थेट म्हणाला, तू काय विचारलंस मला? दारु पिणार का? मी तुझा सिनिअर आहे विसरु नकोस. खाली बस. त्याचा हा अवतार पाहून मी खरंच खाली बसलो. त्याचवेळी विजयेंद्र घाटगे यांची एन्ट्री झाली. आणि, अचानक लाईट बंद झाले. त्यावेळी माझ्यावर स्पॉट लाइट पडला. आणि, मिथूनदाने माझा क्लास घ्यायला सुरुवात केली.''
मिथूनदाने केली रॅगिंग
''माझ्यावर स्पॉट लाइट आल्यावर मिथुनने मला पुन्हा विचारलं यू वॉन हॅव सम बिअर? त्याच्या बोलण्याचा रोख लक्षात घेता. मला माझ्या वाक्याचाच पश्चाताप व्हायला लागला. म्हटलं, यापुढे आयुष्यात कधीच कोणाला बिअर प्यायची ऑफर देणार नाही. त्याचवेळी त्यांनी माझे केस कापायला सुरुवात केली. इतकंच नाही तर माझे कपडेही काढले होते. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी कोंडून सुद्धा ठेवलं होतं.''दरम्यान, कॉलेज जीवनात रॅगिंगपासून सुरु झालेला या दोन अभिनेत्यांचा प्रवास पुढे मैत्रीत बदलला. विशेष म्हणजे आजही त्यांची मैत्री टिकून आहे.
Web Summary : Shakti Kapoor recalls being ragged by Mithun Chakraborty at film school. Mistaking Kapoor's offer of beer as disrespect, Mithun gave him quite the welcome. Despite the rough start, they became good friends.
Web Summary : शक्ति कपूर ने फिल्म स्कूल में मिथुन चक्रवर्ती द्वारा रैगिंग किए जाने को याद किया। कपूर के बीयर के प्रस्ताव को अनादर समझने पर, मिथुन ने उनका स्वागत किया। खुरदरी शुरुआत के बावजूद, वे अच्छे दोस्त बन गए।