Join us

#MeToo: जगानेही महिलांचे म्हणणे ऐकले पाहिजे - अनिल कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 17:20 IST

महिलांवरील अन्यायाला वाचा फुटत असेल तर जे काही सुरु आहे ते खूप चांगले सुरु असल्याचे अनिल कपूर म्हणाले.

ठळक मुद्देमी माझ्या घरातील महिलांचे ऐकतो - अनिल कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या मीटूचे वादळ आले असून अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर छेडछाडीचे आरोप केल्यानंतर चित्रपटसृष्टीत दररोज असे नवनवीन धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. विकास बहल, आलोकनाथ, सलमान खानसह चित्रपटसृष्टीतील बड्या सेलिब्रिटींबाबत असे खुलासे होत आहेत. बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांनीसुद्धा नुकतेच मीटू मोहिमेबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

अनिल कपूर यांनी सांगितले की, “माझ्या घरात तीन महिला आहेत त्या म्हणजे माझी पत्नी सुनिता आणि दोन मुली सोनम व रेहा कपूर. या तिघीही स्वतंत्र आहेत. मी नेहमी त्यांचे म्हणणं ऐकतो आणि जगानेही महिलांचे म्हणणे ऐकायला हवे. माझ्या मते  महिला, मुली या समान नाहीत तर प्रत्येक बाबतीत पुरुषापेक्षा सुपिरिअर आहेत. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फुटत असेल तर जे काही सुरु आहे ते खूप चांगले सुरु आहे.

हॉलिवूडमध्ये सुरु झालेल्या मीटू मोहिमे अंतर्गत तनुश्रीने नाना पाटेकर पाटेकर यांच्यावर आरोप केले. यानंतर अनेक महिल्यांनी आपल्यावर झालेल्या अन्ययाविरोधात वाचा फोडली. आतापर्यंत कैलाश खेरपासून साजिद खानपर्यंत बी-टाऊनमधील अनेक जाणांवर आरोप लावण्यात आले आहेत. साजिद खानवर लावलेल्या आरोपांवरमुळे अक्षय कुमारने 'हाऊसफुल 4' या सिनेमाचे शूटिंग थांबवण्याची विनंती निर्मात्यांना केली होती. यानंतर साजिद खानने स्वत:च या सिनेमाचे दिग्दर्शन सोडत असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली. अक्षय प्रमाणेच आमिर खाननेदेखील मीटू मोहिमेला पाठिंबा दर्शवत मुघल सिनेमातून काढता पाय घेतला आहे. आमिरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, लैंगिक अत्याचार ही गोष्ट चुकीची असून याचे कधीच समर्थन करता येणार नाही. आमिर खान प्रॉडक्शन मध्ये या गोष्टींना किंवा असे करणाऱ्या लोकांना कधीच थारा देण्यात आलेला नाही. 

 

टॅग्स :मीटूअनिल कपूरसोनम कपूर