Join us
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo : माझ्या भावाने असे काही केले असे तर त्याला भोगावेच लागेल- फराह खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 17:43 IST

‘मीटू’ मोहिमेअंतर्गत तीन महिलांनी लैंगिक छळ व गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर दिग्दर्शक साजिद खानविरोधात सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे.आता साजिदची बहीण फराह खान याने या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

मीटू’ मोहिमेअंतर्गत तीन महिलांनी लैंगिक छळ व गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर दिग्दर्शक साजिद खानविरोधात सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही साजिद खानविरोधात रोष व्यक्त होत आहे. केवळ इतकेच नाही तर साजिद खानमुळे ‘हाऊसफुल 4’ हा चित्रपटाचेही ‘पॅचअप’ झाले आहे. हा चित्रपट सोडण्याची वेळ साजिदवर आली आहे. आता साजिदची बहीण फराह खानने या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘हा आमच्या कुटुंबासाठी कठीण काळ आहे. आम्हाला काही कठीण मुद्यांवर काम करावे लागेल़ माझ्या भावाने असे काही केले असेल तर त्याला पायश्चित घ्यावेच लागेल. मी कुठल्याहीप्रकारे त्याच्या या कृत्याचे समर्थन करणार नाही. जी कुणी महिला पीडित आहे, मी तिच्या पाठीशी उभी आहे,’असे ट्विट दिग्दर्शक व कोरिओग्राफर फराह खान हिने केले आहे.

अर्थात याऊपरही फराह खानला ट्रोल केले जात आहे. आधी तू नाना पाटेकरसोबतचा तो फोटो डिलीट कर, असे एका युजरने लिहिले आहे. एका युजरने तर फराहला चांगलेच सुनावले आहे. संपूर्ण इंडस्ट्री तुझ्या भावाबद्दल जाणून आहे आणि तुला माहित नाही? असा प्रश्न या युजरने केला आहे.

फराह खानशिवाय फरहान अख्तर यानेही साजिद खानवर टीका केली आहे. साजिद खानबदद्लच्या बातम्या वाचून मला प्रचंड धक्का बसला, निराशा झाली. साजिदला आपल्या या कृत्यासाठी कसे पायश्चित करावे लागेल, ते मला ठाऊक नाही, असे ट्विट त्याने केले आहे.

टॅग्स :साजिद खानमीटूफराह खान