Join us
Daily Top 2Weekly Top 5

"डिझाइनर्स तुला कपडे देणार नाहीत..."; ' मेधा शंकरने सांगितला सिनेसृष्टीतील कटू अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 11:55 IST

मेधाने तिच्या आगामी 'गिन्नी वेड्स सनी २' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनेक खुलासे केले.

चित्रपटसृष्टीत स्वतःचे नाव कमावणे जेवढे कठीण आहे, तितकेच ते टिकवून ठेवणे आव्हानात्मक असते. अनेकदा कलाकारांना अशा अनुभवांतून जावे लागते ज्यावर ते उघडपणे बोलत नाहीत. मात्र, '१२वी फेल' (12th Fail) सिनेमा फेम अभिनेत्री मेधा शंकर हिने नुकताच सिनेसृष्टीशी संबंधित आपला एक कटू अनुभव शेअर केला आहे. नवोदित अभिनेत्री असल्याने तिला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला हे तिने सांगितले.

सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत मेधाने तिच्या आगामी 'गिन्नी वेड्स सनी २' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनेक खुलासे केले. ती म्हणाली, "मला फिल्म सेटवर कधीही अपमानित झाल्यासारखे वाटले नाही, पण इंडस्ट्रीतील इतर ठिकाणी मी अनेकदा अस्वस्थ (Uncomfortable) झाले आहे. काही ग्लॅमरस इव्हेंट्समध्ये विशेषत: डिझायनर्सकडून ऐकायला मिळतं की 'अमुक एक मोठा डिझाइनर तुला त्याचे कपडे देणार नाही.' वैयक्तिकरित्या मला या गोष्टींचा फरक पडत नाही पण अशा वेळी मला त्या लोकांची नावे मात्र कायम लक्षात राहतात. त्यावेळी 'आत्ता काय घडलं?' असं माझ्य़ा मनात येतं. "चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी संयम आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असल्याचे सांगत, प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो, असे मत मेधाने व्यक्त केले आहे.

मेधाच्या या वक्तव्यावर तिचा सहकलाकार अविनाश तिवारी यानेही तिचे समर्थन केले. अविनाश म्हणाला, "अनेकदा प्रभावशाली लोक गोष्टी त्यांच्या मर्जीनुसार व्हाव्यात अशी अपेक्षा ठेवतात. पण आपण कोणाच्या उपकाराने इथे आलेलो नाही आणि ते सुद्धा कोणाच्या मेहरबानीने इथे नाहीत. प्रत्येकजण आपल्या कौशल्याच्या जोरावर काम करत आहे. त्यामुळे अशा गोष्टींचा जास्त विचार करण्याची किंवा कोणाला घाबरण्याची अजिबात गरज नाही."

मेधा शंकरने विधू विनोद चोप्रा यांच्या '१२वी फेल' चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळवली होती. आता ती २४ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'गिन्नी वेड्स सनी २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Medha Shankar reveals harsh industry experiences: designers deny clothes.

Web Summary : Medha Shankar shared her struggle as a newcomer, facing designer rejections. She emphasizes resilience and learning from every experience, supported by co-star Avinash Tiwari's stance against industry favors. She will be seen in 'Ginni Weds Sunny 2'.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड