Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही अभिनेत्री आज आहे गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड, वाचा तिचा प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 19:23 IST

या अभिनेत्रीच्या अभिनयापेक्षा तिच्या लूक्सची चांगलीच चर्चा लोकांमध्ये झाली होती.

ठळक मुद्देमयुरी कांगो ही सध्या गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड असून यापूर्वी ती परफॉर्मिक्स डॉट रिझल्ट्रीक्स कंपनीच्या पब्लिसीस ग्रुपची मॅनेजिंग डायरेक्टर होती. ही कंपनी गुरगावमधील आहे.

९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री मयुरी कांगोला अभिनयक्षेत्रात तितकेसे यश मिळवता आले नाही. पण तरीही एखाद्या अभिनेत्रीइतकेच महत्त्व आज तिला आहे. ती एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत असून तिच्या यशाची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. 

पापा कहते है या चित्रपटातील घर से निकलते ही... हे गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्यात आपल्याला जुगल हंसराज आणि मयुरी कांगो यांना पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील मयुरीच्या अभिनयाचे कौतुक झाले नसले तरी तिच्या लूक्सची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. गेल्या काही वर्षांपासून मयुरी चित्रपटापासून दूर आहे. पण आता ती कुठे आहे आणि काय काम करत आहे हे तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला नक्कीच आर्श्चयाचा धक्का बसणार आहे. मयुरी कांगो ही सध्या गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड असून यापूर्वी ती परफॉर्मिक्स डॉट रिझल्ट्रीक्स कंपनीच्या पब्लिसीस ग्रुपची मॅनेजिंग डायरेक्टर होती. ही कंपनी गुरगावमधील आहे.

www.afaqs.com या वेबसाईटला मयुरी कांगोने तिच्या व्यावसायिक वाटचालीविषयी एक मुलाखत दिली होती. मयुरीने महेश भट्टच्या 'पापा कहते है चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि मयुरी रातोरात प्रसिद्धीझोतात आली. तिने गेल्या काही महिन्यांपूर्वी दिलेल्या या मुलाखतीत म्हटले होते की, मी एकूण १६ चित्रपट केले होते पण त्यातले अर्ध्याहून अधिक प्रदर्शित झालेच नाही, १९९९ हे वर्ष अभिनेत्रीसाठी फारसे काही चांगले नव्हते. मला चित्रपटात झाडाच्या मागे पुढे डान्स करायला सांगायचे. मग मी पटकथा लिखाण आणि डॉक्युमेंटरीवर लक्ष केंद्रित केले. नंतर २००० मध्ये मी टीव्हीकडे वळली आणि काही वर्षानंतर लग्न करून मी यूएसला शिफ्ट झाले.

अभिनय सोडल्यानंतर न्यूयॉर्कमधील ३६० आय या डिजीटल एजन्सीमध्ये मयुरी नोकरी करू लागली. त्यानंतर त्याच कंपनीत तिला मीडिया मॅनेजर या पदावर बढती मिळाली आणि आता तर ती गुगल इंडियामध्ये कार्यरत आहे. मयुरीने केलेल्या चित्रपटांच्या यादीत 'होगी प्यार की जीत','पापा कहते है', 'जितेंगे हम' हे चित्रपट नक्कीच लक्षात राहण्यासारखे आहेत.

टॅग्स :गुगल