Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मर्दानी ३' ठरला फ्रँचायझीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, राणी मुखर्जीच्या सिनेमाचा जगभरात डंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:32 IST

यश राज फिल्म्सची निर्मिती असलेला 'मर्दानी ३' केवळ देशातच नाही तर जगभरात चांगली कमाई करताना दिसत आहे. 'मर्दानी ३'ने याआधीच्या दोन भागांचे म्हणजेच 'मर्दानी २' आणि 'मर्दानी'चा रेकॉर्ड मोडला आहे. 'मर्दानी ३' हा फ्रँचायझीमधला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत असलेला 'मर्दानी ३' सिनेमा तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. यश राज फिल्म्सची निर्मिती असलेला 'मर्दानी ३' केवळ देशातच नाही तर जगभरात चांगली कमाई करताना दिसत आहे. 'मर्दानी ३'ने याआधीच्या दोन भागांचे म्हणजेच 'मर्दानी २' आणि 'मर्दानी'चा रेकॉर्ड मोडला आहे. 'मर्दानी ३' हा फ्रँचायझीमधला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. 

पहिल्या दिवशी 'मर्दानी ३' सिनेमाने ४ कोटींचं कलेक्शन केलं होतं. त्यानंतर सिनेमाच्या कमाईत चांगली वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. आत्तापर्यंत 'मर्दानी ३'ने देशात ४७.५५ कोटींचा गल्ला जमवला असून ५० कोटींकडे वाटचाल केली आहे. तर जगभरात सिनेमाने ७१.७० कोटींचा गल्ला जमवला आहे. 'मर्दानी १' आणि 'मर्दानी २'च्या तुलनेत 'मर्दानी ३' वरचढ ठरला आहे. या दोन्ही सिनेमांपेक्षा 'मर्दानी ३'ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. 

'मर्दानी ३'चं यश पाहून राणी मुखर्जी म्हणाली, "माझ्यासाठी मर्दानी हा फक्त चित्रपट नाही. तो एक आवाज आहे. प्रत्येक त्या स्त्रीचा आवाज जी गप्प बसण्यास नकार देते. मर्दानी ३ ला मिळालेलं प्रेम आणि यश माझ्यासाठी फार वैयक्तिक आहे. कारण प्रेक्षक फक्त शिवानी शिवाजी रॉयचा प्रवास पाहत नाहीत, तर न्यायासाठी आणि चांगल्याच्या विजयासाठी तिच्या पाठीशी उभे आहेत. ही फ्रँचायझी धैर्याचं आणि स्त्रियांकडे दररोज असणाऱ्या अपार सहनशक्तीचं प्रतीक आहे. मी कृतज्ञ आहे, नम्र आहे आणि अर्थपूर्ण कथा सांगण्याचा माझा निर्धार अधिकच मजबूत झाला आहे.”

English
हिंदी सारांश
Web Title : 'Mardaani 3' Highest Grosser, Rani Mukerji's Film Roars Globally

Web Summary : Rani Mukerji's 'Mardaani 3' becomes the franchise's highest-grossing film. It has surpassed the earnings of its previous installments, collecting ₹71.70 crore worldwide. Mukerji expressed gratitude for the film's success, stating it represents the voice of women who refuse to stay silent and embodies courage.
टॅग्स :राणी मुखर्जीमर्दानी २टिव्ही कलाकार