Join us

रितेश देशमुखच्या नवऱ्याला पाहिलं का? शेअर केला जेनेलियाचा फनी व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 12:28 IST

Ritesh Deshmukh: सोशल मीडियावर सक्रीय असलेला रितेश कायम जेनेलियासोबतचे फनी व्हिडीओ शेअर करत असतो. यावेळीदेखील त्याने असाच एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.

उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर बॉलिवूडसह मराठी कलाविश्वावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख (Ritesh Deshmukh). अभिनयासह मनमिळाऊ स्वभावामुळे रितेश सामान्यांमध्येही लोकप्रिय आहे. त्यामुळेच आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. रितेश सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून तो अनेकदा पत्नी जेनेलियासोबतचे (Genelia DSouza) काही मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. यावेळीदेखील त्याने जेनेलियाचा असाच एक व्हिडीओ शेअर केला असून यात त्याने पत्नीला थेट नवरा म्हटलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेला रितेश कायम जेनेलियासोबतचे फनी व्हिडीओ शेअर करत असतो. यावेळीदेखील त्याने असाच एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत माझा नवरा असं त्याने संबोधलं आहे.

रितेशने एक फिल्टर वापरुन जेनेलियाचा व्हिडीओ शूट केला. या फिल्टरमुळे जेनेलियाला अचानकपणे मिशा आल्या. ज्यामुळे माझा नवरा असं कॅप्शन देत त्याने हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ रितेशने पोस्ट केल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. इतंकच नाही तर जेनेलियानेदेखील त्यावर कमेंट केली आहे.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजासेलिब्रिटीबॉलिवूड