Join us

'तो खूप चांगला माणूस आहे वगैरे म्हटलं जात, पण..'; शाहरुखच्या स्वभावाविषयी गिरीजाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 12:23 IST

Girija oak: शाहरुखच्या 'जवान' या सिनेमात गिरीजाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याचा जवान (jawan) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाचं अनेकांनी अॅडव्हान बुकिंग केलं होतं. त्यामुळे सिनेमा रिलीज होताच पहिल्याच दिवशी थिएटर प्रेक्षकांनी खचाखच भरुन गेले. इतकंच नाही तर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा किंग खानने त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर केली आहे. एकीकडे शाहरुखचं सर्व स्तरांमधून कौतुक होत असतानाच मराठी अभिनेत्री गिरीजा ओक (girija oak) हिने शाहरुखविषयी एक महत्त्वाचं व्यक्तव्य केलं आहे.

शाहरुखच्या 'जवान' या सिनेमात गिरीजाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या सिनेमात पहिल्यांदाच तिचा अॅक्शन मोड दिसणार आहे. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शाहरुखविषयी काही गोष्टींचा खुलासा केला.

काय म्हणाली गिरीजा?

"त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आपण ऐकून आहोत. तो खूप चांगला माणूस आहे. जेंटलमन आहे वगैरे वगैरे..पण, ते सगळं खरं आहे. शाहरुख खान स्वभावाने अगदी विनम्र, मेहनती आहे हे मी ऐकून होते. पण, सेटवर मी चित्रीकरणादरम्यान प्रत्यक्ष अनुभवलं. त्याच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत," असं गिरीजा म्हणाली.

पुढे ती म्हणते, इतकी वर्ष तो अभिनय करतोय. तरीही तो आजही तितकीच मेहनत घेतो. त्याचा सेटवरचा वावर सेटवरील तंत्रज्ञ आणि कलाकार प्रत्येकाला उर्जा देणारा असतो.

टॅग्स :गिरिजा ओकशाहरुख खानबॉलिवूड