अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांना कायम धीरगंभीर, प्रभावशाली भूमिकांमध्ये पाहिलं गेलं आहे. त्यांचं अभिनय कौशल्य काही औरच आहे. सध्या ते 'डिस्पॅच' या सिनेमामुळे चर्चेत आहे. झी५ वर रिलीज झालेल्या या सिनेमात मनोज वाजपेयींनी अनेक किसींग, इंटिमेट सीन्स दिले आहेत. बाथरुम मध्ये असो किंवा कारमध्ये ते अभिनेत्रीसोबत लिपलॉक करताना दिसत आहेत. मनोज वाजपेयींनी या सीन्सला कसा होकार दिला याबाबत नुकतंच भाष्य केलं.
'डिस्पॅच' सिनेमात अभिनेत्री शहाना गोस्वामीने मनोज वाजपेयींच्या पत्नीचं काम केलं आहे. दोघांचे इंटिमेट सीन्स तुफान व्हायरल होत आहेत. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मनोज वाजपेयी म्हणाले, "माझी याबाबत दिग्दर्शकासोबत खूप चर्चा झाली. त्यांनी मला हे सीन करण्यास राजी केलंच. हे सीन्स स्क्रीप्टची गरज होतेच हे मलाही कळत होतं. खूप इंटेन्स सीन आहेत. मी सीन्स करण्यास तयार झालो पण माझ्यातला गावातला मुलगा मला थांबवत होता. जो लाजाळू, रिझर्व असा आहे."
या सीन्सवर बायकोची काय प्रतिक्रिया होती. यावर ते म्हणाले, "माझी बायको याबाबतीत फारच कूल आहे. हा आणि माझ्या पत्नीने उद्या हे सीन्स दिले तरी मला अडचण नाही. कोणत्याही सिनेमा आणि कथेबाबत ती खूप चांगली परीक्षक आहे. त्यामुळे तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण माझी लढाई स्वत:सोबतच होती. मी छोट्या गावातून आलो आहे. मला नेहमीच अशा गोष्टी करायला भीती वाटते. लग्नाआधी माझे जे काही रिलेशन होते त्यातही माझी आय लव्ह यू बोलण्याची हिंमत व्हायची नाही. नेहमी मुलीच बोलायच्या. मी मोकळेपणाने जे वाटतं ते बोलू शकत नाही. मी आजपर्यंत केलेल्या सर्व गोष्टींमध्ये ही सर्वात कठीण गोष्ट होती. यानंतर आता मी कानाला खडा लावला आहे."