Join us

Video: ...अन् अनुराग कश्यप, जयदीप अहलावत, विजय वर्मा यांनी मनोज वाजपेयींच्या पाया पडून घेतला आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:41 IST

मनोज वाजपेयी यांच्याबद्दल इतर कलाकारांच्या मनात किती आदर आहे, याचा अनुभव हा व्हिडीओ पाहून होतो

मनोज वाजपेयी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते. मनोज यांना आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. गेल्या काही वर्षांमध्ये मनोज यांनी बॉलिवूडमध्ये विविध सिनेमांमध्ये काम करुन स्वतःचं एक स्थान निर्माण केलंय. त्यामुळे युवा पिढीतील कलाकारांना मनोज यांच्याबद्दल आदर वाटणं साहजिकक आहे. याचाच अनुभव 'जुगनूमा' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये आला. जेव्हा सर्व कलाकारांनी मनोज यांच्या पायाला स्पर्श करुन त्यांचा आशीर्वाद घेतला.

मनोज यांचा सर्वांनी घेतला आशीर्वाद

 झालं असं की, मनोज वाजपेयी यांच्या आगामी 'जुगनुमा' सिनेमाचं मुंंबईत स्क्रीनिंग होतं. त्यावेळी दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेता जयदीप अहलावत यांनी मनोज वाजपेयींच्या पायांना स्पर्श केला. हा भावनिक क्षण सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. या स्क्रीनिंगमध्ये मनोज बाजपेयी यांच्यासोबत जयदीप अहलावत, अनुराग कश्यप, विजय वर्मा, विनीत कुमार सिंह आणि विक्रांत मेस्सी हेही उपस्थित होते.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, जयदीप अहलावत, अनुराग कश्यप आणि विजय वर्मा मनोज वाजपेयींच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच मनोज क्षणभर गोंधळले आणि हसू लागले. इतर अनेक कलाकारांनीही त्यांच्या या कृतीत सहभाग घेतला. सर्व कलाकारांची मनोज यांच्याबद्दलची मैत्री आणि त्यांच्याविषयीचा आदर यामुळे चाहते खूप प्रभावित झाले. अनुराग कश्यप आणि मनोज बाजपेयी यांचे संबंध खूप जुने आहेत. त्यांनी 'सत्या' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मनोज वाजपेयी यांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

टॅग्स :मनोज वाजपेयीविक्रांत मेसीअनुराग कश्यपबॉलिवूड