Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर जोशींची नात आहे 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, लवकरच झळकणार बिग बजेट सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 17:27 IST

खूप कमी जणांना माहित असेल की मनोहर जोशी यांची नात ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचं आज पहाटे निधन झालं. हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्येतीच्या कारणामुळे कालच त्यांना अॅडमिट करण्यात आलं होतं. मनोहर जोशी यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त झाला आहे. अनेक नेत्यांनी जोशी कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. खूप कमी जणांना माहित असेल की मनोहर जोशी यांची नात ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे.

मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. १९९५ या वर्षी ते युतीच्या सत्तेत राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मनोहर जोशींची मुलगी नम्रता जोशीने शैलेश वाघ यांच्याशी लग्न केले. शैलेश हे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. तर तिची आई नम्रता आर्किटेक्ट आहे. यांचीच शर्वरी वाघ (Sharvari Wagh) ही मुलगी आहे. शर्वरी मनोहर जोशींची नात आहे.

शर्वरी वाघने 'द फॉर्गॉटन आर्मी' वेबसीरिजमधून तिने फिल्मइंडस्ट्रीत पदार्पण केले.यानंतर २०२१ साली तिचा 'बंटी और बबली 2' सिनेमा रिलीज झाला. यासाठी तिला फिल्मफेअर बेस्ट अभिनेत्री डेब्यूचा अवॉर्ड मिळाला. शर्वरीचा जन्म १९९६ साली झाला. ती मुंबईतच लहानाची मोठी झाली. रुपारेल कॉलेजमधून तिने शिक्षण घेतले. आता ती लवकरच जॉन अब्राहमसोबत 'वेदा' या सिनेमात दिसणार आहे. 

टॅग्स :मनोहर जोशीबॉलिवूडसेलिब्रिटी