Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेहतन फळाला आली...! मनीषा राणीने खरेदी केली आलिशान गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 19:47 IST

मनीषा राणी ही कायमच चर्चेत असते. नुकतेच तिने नवी कोरी आलिशान अशी गाडी खरेदी केली आहे.

लोकप्रिय सोशल मीडिया स्टार मनीषा राणी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मनीषा राणी ही कायमच चर्चेत असते. नुकतेच तिने नवी कोरी आलिशान अशी गाडी खरेदी केली असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मनीषाने काळ्या रंगाची मर्सिडीज CLA 200 खरेदी केली आहे. 

आपल्या आलिशान गाडीचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहले, 'स्वप्ने फार दूर राहिले नाहीत. मी माझी पहिली कार घेतली आहे'. तर व्हिडीओमध्ये मनिषा म्हणते, 'स्वप्न एका दिवसात पूर्ण होत नाहीत. पण जर आपण रोज मेहनत केली तर एक दिवस आपली स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील'. व्हिडीओमध्ये मनीषाच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहताना दिसत आहे.

यासोबतच मनीषाने इंस्टाग्रामवर 10 मिलियन फॉलोअर्स झाल्याचेही सेलिब्रेशन केले. मनीषाने काही दिवसांपुर्वी नवीन घरही घेतले होते. तिने चाहत्यांना आपल्या घराची झलकही दाखवली होती. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर मनीषा बिग बॉसनंतर म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली. मनीषाने टोनी कक्करसोबत एक म्युझिक व्हिडीओही केला. लवकरच ती अभिषेक मल्हानसोबत एका गाण्यातही दिसणार आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडबिग बॉस