टीव्ही अॅक्ट्रेस अंकिता लोखंडे लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात अंकिता झलकारी बाईची भूमिका साकारताना दिसणार आहे. तूर्तास अंकिता चर्चेत आहे ती तिच्या पर्सनल लाईफमुळे. होय, अंकिता लवकरच बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत लग्न करणार, अशी चर्चा आहे. पण आता ‘कहानी में नया ट्विस्ट’ आलाय. होय, अंकिताने स्वत:च लग्नाच्या चर्चेवर खुलासा केला आहे.
विकी जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे. अंकिताच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता व विकी एकमेकांच्या जवळ आलेत. दोघांच्याही सगळ्या जवळच्या लोकांना या रिलेशनशिपबद्दल ठाऊक आहे.
अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअप होण्यामागची वेगवेगळी कारणे सांगितली गेली. आता अंकिता पुन्हा आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे.