बॉलिवूड दिवा आणि ग्लोबल आयकॉन असलेली प्रियंका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियंकाने अमेरिकी गायक निक जोनसशी लग्न केले आहे. प्रियंका आणि निकला एक मुलगी असून तिचं नावं मालती असं आहे. मालती कायम चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतंच जोनस ब्रदर्सच्या एका कॉन्सर्टदरम्यान मालतीनं सर्वांचं लक्ष वेधलं. तिचा एक गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कॉन्सर्टमध्ये सर्वांच्या नजरा जोनास ब्रदर्स सोडून मालतीवर खिळल्या. स्टेजजवळ उभी राहून आपल्या वडिलांचा परफॉर्मन्स अगदी गोंडस स्टाईलमध्ये तिनं कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. कॅमेरा धरून ती निकचा व्हिडीओ काढताना दिसली. मालतीचा हा क्युटनेस पाहून चाहत्यांनी "निक जोनासच्या टूरसाठी नवीन फोटोग्राफर मिळाली", अशा प्रतिक्रिया दिल्यात.
प्रियंका आणि निक जोनस २०१८ मध्ये लग्न बंधनात अडकले होते. प्रियंका आणि निकने राजस्थानमधील उम्मेद भवनमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते. त्यानंतर १५ जानेवारी २०२२ रोजी प्रियंका चोप्राने मालती मेरी चोप्रा जोनासचं सरोगसीद्वारे स्वागत केलं. दरम्यान, मालतीची आई प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायचं झाल तर तिचा '‘हेड्स ऑफ स्टेट' चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. यासह तिच्या 'द ब्लफ' या आगामी चित्रपटाचं चित्रीकरणही नुकतंच पूर्ण झालं आहे. सध्या अभिनेत्री 'सिटाडेल' या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचं चित्रीकरण करत आहे.