Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: कोरोनाला मात देताच पार्लरमध्ये पोहोचली मलायका, लोक म्हणाले - इथूनच झाला होता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 15:23 IST

मलायका अरोराला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ती तिच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावरून अपडेट देत राहत होती.

मलायका अरोराने नुकतीच कोरोना व्हायरसला मात दिली आहे. गेल्या ७ सप्टेंबरला ती कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. याची माहिती तिने इन्स्टाग्रामवर एक स्टेटमेंट शेअर करून दिली होती. कोरोनाला मात दिल्यानंतर मलायका नुकतीच सलूनमध्ये आढळून आली. तिचा सलूनमधील व्हिडीओ समोर आला तर लोक तिला ट्रोल करू लागले आहेत.

मलायका अरोराला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ती तिच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावरून अपडेट देत राहत होती. आता ती बरी झाली आहे तर लगेच बाहेर पडताना दिसली.  ती तिच्या घराजवळील सलूनमध्ये गेली होती. तिथे असलेल्या फोटोग्राफर्सनी तिला लगेच कॅमेरात कैद केलं. पण यावरून लोक तिला ट्रोल करू लागले.

एका फॉलोअरने लिहिले की, ती आताच बरी झाली आहे. अशाप्रकारे बाहेर फिरू शकत नाही. एका दुसऱ्या यूजरने लिहिले की, या सलून सेशन्समुळेच मलायकाला कोरोना झाला होता. या सेशन्सशिवाय ती राहूच शकत नाही.

मलायकाने कोरोनातून बरी झाल्यावर तिचा अनुभव शेअर केला होता. मलायकाने कोरोनातून बरी झाल्याची बातमी इन्स्टाग्रामवर दिली होती. तिने लिहिले होते की, रूमच्या बाहेर निघणेही आउटींग करण्यासारखं आहे. 

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडकोरोना वायरस बातम्या