Join us

वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईत परतली, एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 14:04 IST

मलायकाचा पूर्व पती आणि एक्स बॉयफ्रेंड दोघंही पोहोचले

अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora) वडील अनिल अरोरा (Anil Arora) यांनी आज टेरेसवरुन उडी मारत आत्महत्या केली. यामुळे सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. मलायकाच्या वडिलांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं यामागचं कारण सध्या पोलिस तपासत आहेत. दरम्यान ही बातमी समजल्यानंतर सर्वात आधी अरबाज खान (Arbaz Khan)घटनास्थळी पोहोचला. तर मलायका आज सकाळीच पुण्याला रवाना झाली होती. वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच ती तातडीने मुंबईच्या दिशेने निघाली. नुकतंच मलायका आणि अर्जुन कपूरचाही (Arjun Kapoor) घटनास्थळी पोहोचलेला व्हिडिओ व्हायरल होतोय.

मलायका अरोरा पुण्याहून मुंबईत पोहोचली आहे. तिच्या वडिलांनी बांद्रा येथील राहत्या घरी इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली. घराबाहेर पोलिस आणि माध्यमांची गर्दी जमलेली दिसत आहे. या गर्दीतून वाट काढत मलायका आतमध्ये गेली. तिने चेहऱ्याला मास्क लावला होता. मलायकाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

तसंच अभिनेता अर्जुन कपूरही घाईघाईत तिच्या घरी पोहोचला. त्याने पांढरा शर्ट घातला आहे. मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप झाल्याची काही दिवसांपासून चर्चा होती. आता या कठीण प्रसंगी मलायकाचा पूर्व पती अरबाज खान आणि एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूर दोघंही तातडीने पोहोचले आहेत. मलायकाच्या घराबाहेरील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूरबॉलिवूडपरिवारसोशल मीडिया