Join us

माझं आयुष्य कधीच सोपे नव्हतं....आई वडिलांच्या घटस्फोटानंतर मलायका अरोराची झाली होती अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 16:25 IST

मलायका अरोरा(Malaika Arora) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाच्या लहानपणीच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला.

मलायका अरोरा(Malaika Arora)  तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. 2017 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिल्याने लाईमलाईटमध्ये आली होती. दोघांचे 19 वर्षांचं नातं तुटले. यानंतर मलाइकाला मुलगा अरहानचा ताबा मिळाला आणि आता ती 19 वर्षांच्या मुलाला सिंगल मदर म्हणून वाढवत आहे. मलायकाचे आयुष्य कधीच सोपे नव्हते आणि तिने स्वतः तिच्या लहानपणीच तिच्या पालकांचा घटस्फोट पाहिला.

एका मुलाखतीत मलायकाने स्वत: याचा उल्लेख केला, माझे बालपण खूप छान होते पण ते सोपे नव्हते. अनेक चढ-उतार यात आले, परंतु कठीण वेळ तुम्हाला आयुष्यातील महत्त्वाचे धडे शिकवते. वयाच्या 11 व्या वर्षी, आई-वडिल वेगळे झाले. मला माझ्या आईला नवीन आणि अनोख्या चष्म्यातून पाहण्याचा मार्ग मोकळा झाला. मी तिला खूप काम करताना पाहिलं आणि हेही शिकले की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी सकाळी उठून सगळं विसरून कसं स्वतंत्र जगायचं.

आयुष्याच्या सुरुवातीला मला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्याचा मला माझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफसाठी खूप उपयोग झाला. मी पूर्णपणे स्वतंत्र आहे. मी माझं आयुष्य माझ्या स्वतःच्या अटींवर जगते. मलायका सध्या अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. या वर्षाच्या अखेरीस दोघेही लग्नगाठीत अडकू शकतात असे बोलले जात आहे. दोघेही जवळपास चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

टॅग्स :मलायका अरोरा