Join us

'मला तारीख सांग', मलायका अरोराला लेकानेच विचारले लग्नाबद्दल प्रश्न, तिनेही दिलं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 13:50 IST

अरहान खानच्या 'डंब बिर्यानी' या पॉडकास्टमध्ये त्याची आई मलायका अरोराने हजेरी लावली.

अरबाज खान (Arhaan Khan) आणि मलायका अरोराचा (Malaika Arora) मुलगा अरहान खानने मित्रांसोबत मिळून सोशल मीडियावर पॉडकास्टची सुरुवात केली आहे. अरहानने आधी वडील अरबाज आणि काका सोहेल खानसोबत गप्पा मारल्या. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर आता अरहानने त्याच्या आईची म्हणजेच मलायकाचीही मुलाखत घेतली आहे. यामध्ये त्यावे मलायकाला थेट लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. यावर मलायकानेही उत्तर दिलं आहे.

अरहान खानच्या 'डंब बिर्यानी' या पॉडकास्टमध्ये त्याची आई मलायका अरोराने हजेरी लावली. यावेळी मायलेकात मजेशीर संभाषण झालं. मलायकाने अरहानला त्याच्या व्हर्जिनिटीवर प्रश्न विचारल्याने तिच्यावर चांगलीच टीका झाली. तसंच अरहानने आईला लग्नावरच प्रश्न विचारला तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अरहानने विचारलं, 'संपूर्ण जगाला हा प्रश्न पडलाय की तू लग्न कधी करणार? मला तारीख सांग. मला सगळं काही जाणून घ्यायचंय की तू कुठे, कोणासोबत आणि कधी लग्न करणार आहे?'

मलायका लेकाच्या या प्रश्नाला उत्तर देत म्हणाली, "मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. माझ्याकडे याचं उत्तरंच नाहीए तर मी काय बोलू. मला वाटतं सध्या मी माझ्या आयुष्यात सर्वात चांगल्या टप्प्यावर आहे. मी सध्या बेस्ट आयुष्य जगत आहे."

या पॉडकास्टमध्ये मलायका आणि अरहान तसंच अरहानचा मित्र आणि त्याची आई सहभागी झाले होते. दोन्ही मायलेकांनी एकमेकांना वैयक्तिक आयुष्यातले प्रश्न विचारले. मलायकाने पहिल्यांदाच लग्न कधी करणार या प्रश्नावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. तसंच यामधून तिचा लेकासोबतचा असलेला फ्री बाँडही बघायला मिळतोय.

मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं तर अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. दोघांमधील वयाच्या अंतरामुळे तिच्यावर नेहमीच टीका होते. तरी दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं दिसून येतं. मात्र सध्या त्यांचा लग्नाचा विचार नाही हे मलायकाने पॉडकास्टमधून स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :मलायका अरोरालग्नसोशल मीडियाट्रोलपरिवार