Join us
Daily Top 2Weekly Top 5

"वयाच्या ५२ व्या वर्षी आयटम साँग करायला आवडतं...", मलायका अरोराचं टीकाकारांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:12 IST

आयटम साँग मुळे तिची तशीच इमेज झाली आहे यावर तिने मत मांडलं. 

बॉलिवूडची 'स्टाईल आयकॉन' मलाइका अरोरा ही तिच्या डान्स नंबर्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र अनेकदा तिला या कामामुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. वयाच्या पन्नाशीतही मलायका सिनेमांमध्ये आयटम नंबर्स करते. काही महिन्यांपूर्वीच रिलीज झालेल्या 'थामा'मध्ये मलायकाचं आयटम साँग होतं. आधी तिचं 'मुन्नी बदनाम है' गाणं गाजलं होतं.  नुकतंच मलायकाने ट्रोलिंगवर भाष्य केलं. आयटम साँग मुळे तिची तशीच इमेज झाली आहे यावर तिने मत मांडलं. 

नम्रता झकेरिया यांच्या यूट्यूब शोमध्ये बोलताना मलाइकाने तिच्या करिअर आणि प्रतिमेबद्दल नमोकळेपणाने संवाद साधला. तिला विचारण्यात आले की तिच्या डान्स परफॉर्मन्समुळे जी तिची प्रतिमा तयार झाली आहे ती तिला मान्य आहे का? यावर उत्तर देताना मलायका म्हणाली, "का नाही? कमी लेखण्याची किंवा यासाठी माफी मागण्याची काय गरज आहे? लोक तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींसाठी ट्रोल करतात, पण मला यात काहीच गैर वाटत नाही. डान्स हे अभिव्यक्तीचे एक माध्यम आहे. मला खरोखर अभिमान वाटतो की वयाच्या ५२ व्या वर्षीही मी हे सर्व करू शकतेय. याचा अर्थ मी नक्कीच काहीतरी योग्य करत आहे. हे खूप ताकदीचं माध्यम आहे. मला डान्स करुन छान वाटतं."

मलाइका आजही तितकीच ग्लॅमरस आणि सक्रिय आहे. २०२५ मध्ये तिने दोन मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केले.चिलगम या यो यो हनी सिंगसोबतच्या म्युझिक व्हिडिओत ती दिसली. तसंच  'पॉइजन बेबी' हे आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'थामा' चित्रपटातील गाणं गाजलं. दोन्हीतही मलायका स्वॅग पाहायला मिळाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Malaika Arora Defends Item Songs at 52, Shuts Down Critics

Web Summary : Malaika Arora proudly embraces performing item songs, even at 52. She dismisses criticism, viewing dance as powerful self-expression. She remains active, appearing in music videos and films, showcasing her signature style and confidence.
टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडनृत्य