Join us

खिळ्यांवर उभं राहून मलायका अरोरानं केला डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:32 IST

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा सध्या डान्स रिॲलिटी शोमध्ये दिसत आहे. शोमध्ये तिने खिळ्यांवर उभे राहून डान्स केला. हे पाहून रेमो डिसूझा आणि गीता माँ दोघेही थक्क झाले.

बॉलिवूड दिवा मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. तिचा डान्स पाहून चाहते थक्क होतात. मलायकाला डान्सची इतकी आवड आहे की ती कुठेही आणि कोणत्याही प्रकारे नाचू शकते. यावेळी तिने खिळ्यांवर उभे राहून डान्स केला. सध्या मलायका अरोरा इंडियाज बेस्ट डान्सर vs सुपर डान्सर चॅम्पियन्स या डान्स रिॲलिटी शोमध्ये दिसत आहे. खिळ्यांवर अनवाणी उभं राहून मलायकाने अनारकली डिस्को चली या गाण्यावर डान्स केला. तिच्या डान्स व्हिडीओला खूप पसंत केले जात आहे आणि लोक तिचे कौतुकही करत आहेत.

व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हाऊसफुल २ चित्रपटातील अनारकली डिस्को चली या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ती स्टेजवर आली आणि खिळ्यांनी भरलेल्या प्लेटवर अनवाणी उभी राहून मलायका या गाण्यावर थिरकताना दिसली. मलायकाने लाँग गाऊन घातला असून एका व्यक्तीने तिचा गाऊन पकडला आहे. ज्यानंतर ती खिळ्यांवर उभी राहून नाचत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तिचा डान्स पाहून रेमो डिसूझा आणि गीता माँही तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव मलायकाचा डान्स पाहून तिचे चाहते काळजीत पडले आहेत. एका चाहत्याने लिहिले की, मॅडम, तुम्ही ठीक आहात का? तर दुसऱ्याने लिहिले की, नाचत राहा आणि ड्रामापासून दूर राहा. मलायकाच्या या व्हिडिओला हजारो लोक लाइक करत आहेत. मलायका अरोराही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका सर्वत्र चर्चेत आहे. २०२४ हे वर्ष मलायकासाठी खूप कठीण गेले, आता तिने नवीन वर्षात नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिने याबाबत सांगितले होते.

टॅग्स :मलायका अरोरा