Join us

'बवाल कर दिया भाभी ने तो', मलायकाचा गोव्यातील बोल्ड फोटो पाहून फॅन्सची उडाली झोप....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 13:58 IST

कालच मलायका अरोराने स्वीमिंग पूलमधील फोटो शेअर केले होते. आता तिने ग्रीन ड्रेसमधील हॉट फोटो शेअर केले आहेत. जे बघून तिच्या फॅन्सची झोप फडाली आहे. 

मलायका अरोरा सध्या बहीण अमृता अरोरा आणि फॅमिलीसोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करत आहे. या ट्रिपवर तिच्यासोबत बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरही आहे. मलायकाने तिचे या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कालच तिने स्वीमिंग पूलमधील फोटो शेअर केले होते. आता तिने ग्रीन ड्रेसमधील हॉट फोटो शेअर केले आहेत. जे बघून तिच्या फॅन्सची झोप उडाली आहे. 

मिंट ग्रीन को-ऑर्ड सेटमध्ये मलायका

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत मलायका अरोरा मिंट ग्रीन कलरच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. मलायकाचा हा ड्रेस सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण आधीच मलायकाचं सौंदर्य सर्वांना आकर्षित करतं. त्यात तिचा हा बोल्ड ड्रेस सर्वाना चक्रावून सोडतोय. 

मलायकाचा हा फोटो पाहून तिचे फॅन्स आणि सेलिब्रिटी तिची भरभरून प्रशंसा करत आहेत. काहींनी फोटो स्टनिंग असल्याचं सांगितलं कर काही म्हणाले की, 'बवाल कर दिया भाभी ने तो'.

अर्थातच यात काहीही शंका नाही की, मलायकाकडे वेगवेगळ्या ब्रॅंडचे महागडे कपडे असतील. ती लाखो रूपयांचे कपडे वापरत असेल. मात्र, तिचा हा ग्रीन मिंट ड्रेस तुम्हाला वाटतो तेवढा महागडा अजिबात नाही. या ड्रेसची किंमत वेबसाइटवर दिली आहे. हा ड्रेस केवळ ५,९९९ रूपयांचा आहे. 

स्विमसूटमध्ये जलवा

मलायकाला वॉटर बेबी असं म्हटलं जातं. कारण बीचवर सुट्टी एन्जॉय करण्यासोबतच तिला स्वीमिंग पूलमध्ये जास्त वेळ घालवणं आवडतं. याचे कितीतरी फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तुम्हाला बघायला मिळतील. मलायकाने गोव्यातील पाण्यात एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत. स्वीमिंग पूलमध्ये तिच्यासोबत बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरही दिसत आहे. 

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडसोशल मीडियासोशल व्हायरल