Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बेल बॉटम'च्या शूटिंगवेळी महेश भूपतीनं लारा दत्ताला ओळखलंच नाही, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 14:31 IST

‘बेल बॉटम’ सिनेमातील कलाकार अक्षय कुमार, वाणी कपूर आणि हुमा कुरेशी तसेच निर्माता जॅकी भगनानीने नुकतेच 'द कपिल शर्मा' शोमध्ये हजेरी लावली होती.

बेल बॉटम’ सिनेमातील कलाकार अक्षय कुमार, वाणी कपूर आणि हुमा कुरेशी तसेच निर्माता जॅकी भगनानीने नुकतेच सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. हा एपिसोड रविवारी पहायला मिळणार आहे. हे सर्व कलाकार कपिलसोबत मजेशीर आणि मोकळेपणाने संवाद करताना दिसतील. तसेच शोच्या कलाकारांसोबत विनोदी अॅक्टचा आनंद घेताना दिसतील. 

चित्रपट चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल कलाकारांशी संवाद साधताना, कपिल शर्मा अभिनेत्री लारा दत्ताच्या लूकची प्रशंसा करत म्हणाला, “चित्रपटात लाराचा लूक इंदिरा गांधी म्हणून इतका चांगला आहे की, ती ओळखूच येत नाही.”  याला प्रतिसाद देताना, अक्षय कुमार म्हणाला, “ज्या दिवशी चित्रपटाचे शूटिंग सुरु होते, त्या दिवशी महेश भूपती (लारा दत्ताचे पती) तिला भेटायला सेटवर आले होते, तेव्हा त्या गेटअप मध्ये त्यांनीही तिला ओळखले नाही.”   

बेल बॉटम चित्रपट हेरगिरीवर आधारीत आहे. ही कथा ८०च्या दशकातील आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने सीक्रेट एजेंटची भूमिका साकारली आहे. यात अभिनेता चेस प्लेअर आहे जो गाणे शिकवतो. त्याला हिंदी आणि इंग्रजी भाषेसोबत जर्मन भाषादेखील येते. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार आणि लारा दत्ताशिवाय वाणी कपूर, हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १९ ऑगस्टला रिलीज झाला आहे.

टॅग्स :द कपिल शर्मा शोबेल बॉटमअक्षय कुमारलारा दत्ताहुमा कुरेशी