Join us

Mahesh Bhat : महेश भट यांच्यावर झाली हृदयशस्त्रक्रिया, मुलगा राहुल भटने दिली मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 10:02 IST

महेश भट यांच्याबाबत नुकतीच एक बातमी समोर आली आहे. महेश भट यांच्यावर काही दिवसांपूर्वीच हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Mahesh Bhat :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक भट कुटुंब. भट कुटुंबातील महेश भट यांच्याबाबत नुकतीच एक बातमी समोर आली आहे. महेश भट यांच्यावर काही दिवसांपूर्वीच हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महेश भट यांचा मुलगा आणि आलिया भट (Alia Bhatt) चा सावत्र भाऊ राहुल भटने (Rahul Bhatt) ईटाईम्सशी बोलताना माहिती दिली आहे.

राहुल भट म्हणाला, 'काही दिवसांपूर्वी महेश भट यांच्या छातीत दुखत होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. चार दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.'

राहुल पुढे म्हणाला, 'वडील महेश भट यांना आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना हृदयशस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. त्यानंतर त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ते आता घरी आले आहेत. आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा स्थिर आहे.'

गेल्या अनेक दिवसांपासून महेश भट हे सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत.त्यामुळे सर्वांनाच त्यांच्या प्रकृतीची चिंता होती. आता ठणठणीत आहेत.  महेश भट यांनी सडक २ हा चित्रपट नुकताच दिग्दर्शित केला होता. यामध्ये आलिया भट आणि आदित्य रॉय कपूर यांची मुख्य भूमिका होती.

टॅग्स :महेश भटआलिया भटआरोग्य