Join us

Mahesh Babu : महेश बाबूची लेक सिताराचं हे टॅलेंट पाहिलं का? सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 17:19 IST

Mahesh Babu Daughter Sitara Ghattamaneni : महेश बाबू चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. पण त्याची लेक सितारा सुद्धा कमी नाही. आई नम्रता शिरोडकरसारखीच सुंदर आणि बाबा महेशबाबूसारखीच टॅलेंटेड सितारा सध्या जाम चर्चेत आहे...

महेश बाबू (Mahesh Babu  ) साऊथचा किती मोठा स्टार आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. चाहत्यांच्या गळ्यातील तो ताईत आहे. पण त्याची लेक सितारा सुद्धा कमी नाही. आई नम्रता शिरोडकरसारखीच सुंदर आणि बाबा महेशबाबूसारखीच टॅलेंटेड सितारा सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे, एका रिअ‍ॅलिटी शोमधील तिचा डान्स.होय, ‘डान्स इंडिया डान्स तेलुगू’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये महेशबाबू त्याची मुलगी सितारा घट्टामनेनीसोबत ( Sitara Ghattamaneni) पोहोचला. या मंचावर सितारा थिरकताना दिसली. डान्स शोच्या मंचावर लेकीला थिरकताना पाहून महेश बाबूच्या चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. एकाचवेळी आनंद आणि कौतुक अशा भावना तो अनुभवत होता.  

‘डान्स इंडिया डान्स तेलुगू’ चा हा एपिसोड झी तेलुगूवर येत्या रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित होईल. याचा एक प्रोमो  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महेश बाबू आपल्या मुलीचा हात हातात घेऊन रेड कार्पेटवर चालताना दिसतोय. दोघेही ग्रँड एंट्री करत स्टेजवर पोहोचतात.  सितारा इतर स्पर्धकांबरोबर डान्स करते आणि महेश बाबू आपल्या मुलीला डान्स करताना कौतुकाने बघतो.

9 कोटींची डील!!मीडिया रिपोर्टनुसार, महेशबाबूने या शोमध्ये येण्यासाठी झी तेलगूसोबत 9 कोटींची डील साईन केली. याचमुळे तो लेकीला सुद्धा सोबत घेऊन आला. पहिल्यांदाच सितारा व महेशबाबूंनी अशाप्रकारे स्टेज शेअर केला.

महेश बाबूची लेक सितारा मोठी स्टारकिड आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड लोकप्रिय आहे. तिचं स्वत:चं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. याठिकाणी तिला लाखो लोक फॉलो करतात. महेश बाबूच्या ‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटातील एका गाण्यात सितारा दिसली होती. पेनी या गाण्यात सितारा अतिशय स्टायलिश डान्स मूव्ह करताना दिसली होती,   

टॅग्स :महेश बाबूTollywood