एक चित्रपट आला आणि त्याने केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. याचाच फायदा चित्रपटाच्या कमाईवरही झालेला दिसून आा. हा चित्रपट म्हणजे ‘महावतार नरसिंह’. बॉलिवूडमधील सर्वात जास्त नफा कमावणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणून ‘महावतार नरसिंह’ या चित्रपटाने आपले स्थान निश्चित केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. अवघ्या १५ कोटींचं बजेट असलेल्या ‘महावतार नरसिंह’ चित्रपटाने किती कमाई केली, जाणून घ्या
बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी
‘Sacnilk’च्या रिपोर्टनुसार, ‘महावतार नरसिंह’ने प्रदर्शनाच्या २८व्या दिवशीही आपली यशस्वी घोडदौड सुरूच ठेवली. चित्रपटाने गुरुवारी १.५० कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे ‘महावतार नरसिंह’ची एकूण कमाई २१८.६० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जी बक्कळ कमाई केलीय त्यामुळे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही याचे कौतुक केले आहे. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने इतकी मोठी कमाई केल्यामुळे, बॉलिवूडमधील २०२५ चा जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
चित्रपटाच्या यशामुळे निर्माते आणि दिग्दर्शक दोघेही खूप समाधानी आहेत, कारण त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं आहे. ‘महावतार नरसिंह’च्या यशामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये चित्रपटाचा आकर्षक विषय, उत्कृष्ट आणि प्रभावी अॅनिमेशन, दमदार संवाद आणि उत्तम दिग्दर्शन यांचा समावेश आहे. हा चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक प्रेक्षकांना आवडला आणि त्यामुळेच तो इतका यशस्वी झाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २१८ कोटींहून अधिक कमाई करून दाखवून दिले आहे. आजवर भारतात जे अॅनिमेशनपट निर्माण झाले त्यापैकी ‘महावतार नरसिंह’हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.