Join us
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांना घेऊन जा 'मडगाव एक्सप्रेस' बघायला! सिनेमाची विशेष ऑफर चुकवू नका, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 18:31 IST

कुणाल खेमू दिग्दर्शित उपेंद्र लिमयेची खास भूमिका असलेला 'मडगाव एक्सप्रेस'साठी खास ऑफर, आताच जाणून घ्या

कुणाल खेमूचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा अर्थात 'मडगाव एक्सप्रेस'ची उत्सुकता शिगेला आहे.  'मडगाव एक्सप्रेस' च्या ट्रेलरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे सिनेमात मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये प्रमुख भूमिकेत आहे. उद्या 'मडगाव एक्सप्रेस' सगळीकडे रिलीज होतोय. अशातच  'मडगाव एक्सप्रेस'च्या पहिल्याच दिवशी सिनेमाच्या टीमने प्रेक्षकांसाठी खास ऑफर ठेवली आहे.

'मडगाव एक्सप्रेस' पाहण्यासाठी सिनेमाच्या टीमने पहिल्याच दिवशी म्हणजे उद्या सिनेमाच्या रिलीज डेटला प्रेक्षकांना एक खास ऑफर दिलीय. उद्या एका तिकीटावर एक तिकीट फ्री अशी ही ऑफर आहे. यासाठी लोकांना MADGAON हा खास कोड बुक माय शोवर टाकावा लागेल. ही ऑफर फक्त उद्यापर्यंत लागू आहे. त्यामुळे 'मडगाव एक्सप्रेस'मधील मित्रांची ही धम्माल मस्ती पाहायला तुम्ही सुद्धा या ऑफरचा वापर करुन मित्रांसोबत सिनेमाचा आनंद घेऊ शकता.

'मडगाव एक्सप्रेस' सिनेमाबद्दल सांगायचं तर अभिनेता कुणाल खेमूचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे. या सिनेमात प्रतीक गांधी, द्विवेंदू शर्मा, नोरा फतेही, अविनाश तिवारी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. इतकंच नव्हे तर मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री छाया कदम सुद्धा सिनेमात विशेष भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तीन मित्रांच्या गोव्याला जाण्याची धम्माल कहाणी बघायला मिळणार आहे.

टॅग्स :कुणाल खेमूउपेंद्र लिमये बॉलिवूड