'स्त्री', 'स्त्री २', 'थामा' अशा अनेक सुपरहिट सिनेमांनंतर मॅडॉक फिल्म्सच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मॅडॉकच्या पुढील सिनेमाची घोषणाही मागेच झाली आहे. 'शक्ती शालिनी' असं सिनेमाचं नाव आहे ज्यात 'सैयारा' फेम अभिनेत्री अनीत पड्डा मुख्य भूमिकेत असणार आहे. तर आता तिच्यासोबत मुख्य अभिनेता कोण असणार याचंही नाव समोर आलं आहे. कोण आहे तो?
भारताकडून ऑस्करला गेलेला सिनेमा 'होमबाऊंड' मध्ये दिसलेला अभिनेता विशाल जेठवाची 'शक्ती शालिनी'मध्ये एन्ट्री झाली आहे. विशाल जेठवा ज्याने 'मर्दानी २' मधील आपल्या नकारात्मक भूमिकेने बॉलिवूडला हादरवून सोडले होते, तो आता एका पूर्णपणे वेगळ्या आणि रोमँटिक अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिनेमाचं शूट पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये सुरु होणार आहे. सिनेमात दमदार ड्रामा आणि अॅक्शन सीन्स पाहायला मिळतील. विशाल आणि अनीत यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री कशी असेल, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर या जोडीचे नाव समोर आल्यापासूनच चाहत्यांनी या प्रोजेक्टबद्दल पसंती दर्शवली आहे. 'शक्ती शालिनी'ची निर्मिती आणि दिग्दर्शन तांत्रिकदृष्ट्या प्रगत असणार असून, चित्रपटाचे संगीत हा या कथेचा मुख्य आत्मा असेल असे बोलले जात आहे. पारंपरिक प्रेमकथेला आधुनिक ट्विस्ट देऊन हा सिनेमा तरुण पिढीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे. विशाल आणि अनीत यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची आणि अधिकृत टीझरची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हा सिनेमा यावर्षी २४ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. यात काही इमोशनल अँगलही पाहायला मिळतील. मॅडॉकच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचाच हा एक भाग आहे. मॅडॉकचे याचवर्षी 'भेडिया २' आणि वर्षाच्या शेवटी 'चामुंडा' हे सिनेमेही प्रदर्शनाच्या रांगेत आहेत.
Web Summary : Vishal Jethwa, known for 'Mardaani 2,' will star opposite Annett Padda in Maddock Films' 'Shakti Shalini.' The movie promises drama, action, and romance. Shooting begins in March, with a December 24 release planned. It's part of Maddock's horror-comedy universe.
Web Summary : 'मर्दानी 2' फेम विशाल जेठवा मैडॉक फिल्म्स की 'शक्ति शालिनी' में अनित पड्डा के साथ नजर आएंगे। फिल्म में ड्रामा, एक्शन और रोमांस का तड़का होगा। शूटिंग मार्च में शुरू होगी और 24 दिसंबर को रिलीज होगी। यह मैडॉक के हॉरर-कॉमेडी यूनिवर्स का हिस्सा है।