Join us  

पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 9:44 AM

मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज  मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे

ठळक मुद्देदेसी गर्ल प्रियंका चोप्राने ही आपल्या मतदान केले आहे

मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज  मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. बॉलिवूड सेलिब्रेटी ही आज आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसतील.  अभिनेत्री रेखा आणि प्रियंका चोप्राने सकाळी सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

रेखा यांचा मतदान केल्याचा फोटो समोर आला आहे. त्यांनी वांद्रयातील मतदान केंद्रावर जावून आपला हक्क बजावला. रेखा नेहमीच आपला मतदानाचा हक्क बजावतात. 

देसी गर्ल प्रियंका चोप्राने ही आपल्या मतदान केले आहे. प्रियंकाने मतदान केल्यानंतरचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले आहे.  

अभिनेता रणवीर सिंगने देखील सर्वसामान्य जनतेप्रमाणे रांगेत उभं राहुन मतदानाचा हक्क बजावला आहे. 

करीना कपूरने आपल्या मतदानाचं हक्क बजावला आहे. करीना कपूरसोबत तैमूरसुद्धा दिसला. 

 कंगना राणौतने सुद्धा मतदान केलं आहे.  

 

 विद्या बालनने सहकुटुंब मतदानचा हक्क बजावला आहे. 

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. ऊर्मिला काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यावर विरोधात त्या निवडणुक लढवत आहेत. 

 अभिनेता रवी किशन यांनी देखील मतदान केलं आहे. रवी किशन यांनी गोरेगावमधल्या मतदान केंद्रावर रांगेत उभे राहुन मतदान केले आहे. रवी किशन गोरखपुरमधून भाजपकडून निवडणुक लढवत आहेत. 

अभिनेता राजपाल यादवने देखील मतदान केलं आहे. त्यांने सोशल मीडियावर मतदान केल्याचा फोटो शेअर करत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे.      

 

 

अभिनेता संजय दत्तने पत्नी मान्यता दत्तसह आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमानने मतदानाचा हक्क बजावला आहे आणि त्याने फोटो शेअर करून विचारले की मी मतदान केले, तुम्ही केले का?

वरून धवनने मतदान केले असून त्याने त्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

मलयका अरोरा हिनेदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

तर अर्जुन कपूरने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

अभिनेत्री भूमी पेडणेकर पुण्याला चित्रीकरण करत होती. तिथे अठरा तासांचे नाइट शूट आटपून ती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबईत आली. तिने मतदान केल्याचा फोटो शेअर केला.

अभिनेत्री सोहा अली खानने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने देखील मतदानाचा हक्क बजावला असून तिच्यासोबत तिचा नवरा गोल्डी बहलनेदेखील मतदान केले आहे.

अभिनेत्री दीया मिर्झा हिने वांद्रे येथे मतदानाचा हक्क बजावला. 

अभिनेता फरहान अख्तरने देखील मतदान केले असून त्याने चांगल्या गोष्टी करा व मतदान करा. 

अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

मोहेंजोदारो फेम पूजा हेगडे हिनेदेखील मतदान केले आहे.

अभिनेत्री कियारा आडवाणीने मतदानाचा हक्क बजावला असून तुम्ही देखील मतदान केले का? विचारले आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने मतदानाचा हक्क बजावला असून तिने प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने देखील मतदान केले असून स्वतःचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून म्हटले की, मतदान आपला हक्क आहे. हा हक्क बजावला पाहिजे. देशाचे भवितव्य आपल्या हातात आहे. त्यामुळे आपले कर्तव्य बजावले पाहिजे.

 

अभिनेता रणबीर कपूरने मतदानाचा हक्क बजावला आहे.

अभिनेत्री प्रिती झिंटाने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि अभिषेक व ऐश्वर्याने मतदानाचा हक्क बजावला.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने देखील मतदानाचा हक्क बजावला.

जावेद अख्तर व शबाना आझमी यांनीदेखील मतदान केले.

रोशन कुटुंबानेदेखील मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री दीपिका पादुकोणनेदेखील मतदान केले.

अनुष्का शर्माने मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अनोख्या अंदाजात फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने देखील बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता शरद केळकरने देखील मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री काजल अग्रवाल हिने मतदानाचा हक्क बजावला आणि सुजाण नागरिक असाल तर मतदान करा, असे सोशल मीडियावर म्हटले.

तर शाहरूख खान व त्याची पत्नी गौरी खान यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी अबरामलादेखील मतदान केंद्रावर मतदान कसे होते, हे दाखवण्यासाठी नेले होते.

बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगण व काजोलनेदेखील मतदान केले.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :प्रियंका चोप्रारेखाउर्मिला मातोंडकरलोकसभा निवडणूक २०१९मलायका अरोराअर्जुन कपूरभूमी पेडणेकर सोहा अली खानदीया मिर्झासोनाली बेंद्रेफरहान अख्तरऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चनपूजा हेगडेसलमान खानकियारा अडवाणीकरिश्मा कपूरमाधुरी दिक्षितधमेंद्रदीपिका पादुकोणअनुष्का शर्माहेमा मालिनी