आमिर खानचा भाचा इमरान खान बऱ्याच वर्षांनंतर सिनेसृष्टीत अॅक्टिव्ह झाला आहे. नुकतंच त्याने आमिर खान निर्मित 'हॅपी पटेल' सिनेमात कॅमिओ केला. आता लवकरच त्याचा सिनेमा येणार आहे. दुसरीकडे इमरान खान वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. लहानपणीच्या मैत्रिणीसोबतचा संसार मोडल्यानंतर आता तो लेखा वॉशिंग्टनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघं लिव्ह इनमध्येही राहत आहेत. दरम्यान त्यांच्या नात्याला लव्ह जिहादचा अँगल दिला जात आहे. त्यावर लेखाने नुकतंच भाष्य केलं आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मनी कंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत लेखाने इमरानसोबतच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, "सोशल मीडियावर ट्रोलर्सने आमच्या नात्याला लव्ह जिहादचा अँगल दिला. माझे व्हिडीओ वापरुन नकारात्मकता पसरवली जात आहे. ही अशी गोष्ट आहे ज्याच्या मी पूर्ण विरोधात आहे. ह्युमरसोबत डील करणं महत्वाचं आहे. मी पुरोगामी कुटुंबातली आहे याबद्दल मी स्वत:ला नशिबवान समजते. माझ्या स्वत:च्या कुटुंबियांना काही समस्या नाहीये.माझ्या पार्टनरचं कुटुंबही असंच आहे. मल्टीकल्चरल, दयाळु, क्रिएटिव्ह आणि चांगली माणसं एकमेकांना पाठिंबा देतात. मी खरंच नशिबवान आहे."
"जेव्हा लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात तेव्हा त्यांचंच व्यक्तिमत्व दिसतं. ज्या जगात आपण राहतोय तिथे अॅपिअरन्सवरुन जज केलं जातं. मी नेहमीच माझं बेस्ट देईन आणि चांगलं काम करेन. नकारात्मकता पसरवणारे तेच करतील पण प्रेम करणारे प्रेमच करतील."
Web Summary : Leakha Washington addressed the 'Love Jihad' accusations surrounding her relationship with Imran Khan. She emphasized her progressive upbringing and support from both families, dismissing negativity and focusing on love and good work.
Web Summary : लेखा वाशिंगटन ने इमरान खान के साथ अपने रिश्ते पर 'लव जिहाद' के आरोपों का जवाब दिया। उन्होंने अपने प्रगतिशील परवरिश और दोनों परिवारों के समर्थन पर जोर दिया, नकारात्मकता को खारिज कर दिया और प्यार और अच्छे काम पर ध्यान केंद्रित किया।