Join us

यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर फुटणार 'लक्ष्मी बॉम्ब', महिलेच्या गेटअपमध्ये दिसतोय खिलाडी कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 18:36 IST

अखेर अक्षय कुमारचा आगामी चित्रपट लक्ष्मी बॉम्बची रिलीज डेट आली समोर

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारचा आगामी चित्रपट लक्ष्मी बाँबच्या रिलीजबाबत वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. लक्ष्मी बाँब चित्रपट आधी ईदच्या मुहूर्तावर रिलीज केला जाणार होता पण लॉकडाउनमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर अक्षय कुमारच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच ९ सप्टेंबरला रिलीज केला जाणार होता आणि १८ ऑगस्टला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला जाणार होता. तसे झाले नाही त्यामुळे लक्ष्मी बाँब ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाही चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे, अशी चर्चा सुरू होती. 

अक्षय कुमारने ट्विट करत लक्ष्मी बाँब चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा केली आहे. अक्षय ट्विट केले की या दिवाळीला तुमच्या घरी ल्क्षमीसोबत एक धमाकेदार बॉम्बदेखील येणार आहे. लक्ष्मी बॉम्ब ९ नोव्हेंबरला रिलीज होत आहे फक्त डिस्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर. एका वेडसर प्रवासासाठी तयार व्हा कारण ही दिवाळी लक्ष्मी बॉम्बवाली आहे.

लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट तमिळ सिनेमातील ‘कंचना 2’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.

अक्षय कुमार आपल्या अभिनयाच्या माध्यमातून फॅन्सना नेहमीच काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. या सिनेमात अक्षय एका ट्रान्सजेंडर भूताची भूमिका साकारणार आहे. अक्षय कुमारला ब-याच दिवसांपासून ‘कंचना 2’ची स्क्रिप्ट आवडली होती आणि त्यामुळे या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यासाठी त्याने होकार दिला होता.

टॅग्स :अक्षय कुमारकियारा अडवाणी