Join us

कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:58 IST

कुणाल कपूरने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत.

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayan) सिनेमाची सध्या चर्चा आहे. या सिनेमात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, सनी देओल, यश, आदिनाथ कोठारे, रवी दुबे, लारा दत्ता असे अनेक कलाकार आहेत. सिनेमा अभिनेता कुणाल कपूरही (Kunal Kapoor)  आहे जो इंद्र देवाच्या भूमिकेत दिसणार आहे. कुणालचा सेटवरील एक फोटो आता व्हायरल होतोय. यामध्ये तो रणबीर कपरूवरही भारी पडेल अशा प्रतिक्रिया येत आहेत. 

कुणाल कपूरने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यात त्याचा फिटनेस, लूक पाहून चाहते प्रभावित झाले आहेत. त्याच्या शार्प जॉ लाईनवर तर तरुणी फिदा झाल्या आहेत. दुसरा त्याने शूटिंग करतानाचा फोटो शेअर केला आहे. हा कुणालचा इंद्र देवाच्या लूकमधील फोटो असल्याचं बोललं जात आहे. त्याची फिजीक, गुड लूक्स पाहता तो इतर कलाकारांवर भारी पडेल अशी सगळे प्रतिक्रिया देत आहेत.

नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाच्या काही भागाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. रणबीर आणि साई पल्लवीचे प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या भूमिकेतील सीन्स शूट झाले आहेत. तर आता सध्या यश रावणाच्या भूमिकेतील शूट करत आहे. सनी देओलने अद्याप शूटिंग सुरु केलेलं नाही. तो हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा पहिला भाग २०२६ आणि दुसरा भाग २०२७ रिलीज होण्याचा अंदाज आहे. 

कुणाल कपूर नुकताच सैफ अली खान, जयदीप अहलावतच्या 'ज्वेल:द थीफ' या सिनेमातही दिसला. नेटफ्लिक्सवर सिनेमा रिलीज झाला होता. आता त्याच्या 'रामायण'मधील भूमिकेसाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :कुणाल कपूररामायणबॉलिवूड