Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदिपुरुषवर टीका, क्रिती सेननच्या आईने लोकांनाच दिला 'हा' सल्ला; नेटकरी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 12:28 IST

सिनेमावर होत असलेल्या टीकेवर प्रभास, क्रिती सेनन किंवा सैफ अली खान यांच्यापैकी कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमा प्रचंड ट्रोल होतोय. दिग्दर्शक ओम राऊत पासून ते सिनेमाची संपूर्ण टीम सगळेच लोकांच्या निशाण्यावर आलेत. सिनेमात क्रिती सेनन (Kriti Sanon) सीता मातेच्या भूमिकेत आहे. सिनेमावर होत असलेल्या टीकेवर प्रभास, क्रिती सेनन किंवा सैफ अली खान यांच्यापैकी एकानेही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण क्रिती सेननच्या आईने नुकत्याच एका पोस्टमधून लोकांना सल्ला दिला आहे.

बुधवारी क्रिती सेननची आई गीता सेननने (Geeta Sanon) इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. त्यात लिहिले की, 'जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी' याचा अर्थ हा की चांगल्या विचाराने आणि दृष्टीने पाहिलं तर सृष्टी सुंदरच दिसेल. शबरीने दिलेली बोरं उष्टी आहेत हे बघु नका तर त्यामागचं तिचं प्रेम बघा अशी शिकवण प्रभू श्रीरामानेच दिली आहे. मनु्ष्याच्या चुकांकडे नाही तर त्यामागच्या भावनांना समजून घ्या. जय श्री राम!'

गीता सेनन यांची ही पोस्ट वाचून एक युजर म्हणाला, 'मॅडम, प्रत्येक गोष्टीला पैसे कमावण्याच्या दृष्टीतून योग्य नाही ठरवलं जाऊ शकत. कमीत कमी धर्माला या गोष्टींपासून दूर ठेवा. त्यांनी पैसे कमावण्यासाठी धर्माचा वापर केला. पण त्याचा आदर केला नाही. त्यांना लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे.' 

आदिपुरुषची कमाई

16 जून रोजी आदिपुरुष रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी सिनेमाने ५० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला. नंतर कमाईत काहीशी घट झाली. ५ दिवसात आदिपुरुषने 247.80 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर सहाव्या दिवशी कलेक्शनमध्ये प्रचंड घट झाली. काल चित्रपटाने केवळ  7.50 कोटींचा धंदा केला.

टॅग्स :आदिपुरूषक्रिती सनॉनबॉलिवूडप्रभास