Join us

भावाप्रमाणे फिटनेस फ्रिक असणाऱ्या ‘बोल्ड गर्ल’नं सांगितलं तिच्या लग्नाबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 18:14 IST

25 वर्षांच्या या ‘दबंग गर्ल’ने साखरपुडा केल्याचीही चर्चा होती.

टायगर श्रॉफची छोटी बहिण व अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ नेहमी चर्चेत असते. तिच्या चाहत्यांना तिलाही बॉलिवूडमध्ये काम करताना पहायचं आहे. मात्र तिचे बॉलिवूडमध्ये काम करण्याचा अद्याप तरी विचार दिसत नाही. सध्या तिनं बास्केटबॉल प्लेअर एबन हयंससोबतच्या नात्यावर लक्ष केंद्रीत केलेलं दिसतंय. नुकतंच कृष्णानं एका मुलाखतीत एबनसोबतच्या नात्याबद्दल सांगितलं. 

कृष्णाचं एबनवर प्रेम आहे आणि ती त्याच्याबद्दल सांगायला अजिबात घाबरत नाही. तिने त्यांच्या प्रेमाची सुरूवात कशी झाली याबद्दल स्पॉटबॉय या वेबसाईटला सांगितलं. ती म्हणाली की, आमची भेट सोबो हाऊसमध्ये झाली होती. मी त्याच्या एका मित्राला ओळखत होते.आम्ही एकमेकांना भेटण्यासाठी एकत्र आलो होते. त्या मित्राने एबनला तिथे बोलवलं. माझं त्याच्याशी बोलणं झालं. आम्ही बास्केटबॉलबद्दल बोललो कारण आम्हाला दोघांना बास्केटबॉल आवडतं. 

तिने पुढे सांगितलं की, मी त्याला माझा नंबर मित्राकडून घ्यायला सांगितला होता. एबनने मला मॅसेज पाठवला होता. तो एथलीट आहे आणि फिटनेस त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्याने मला त्याची जिम पहायला बोलवलं होतं. त्यानंतर आम्ही एकमेकांशी बोलू लागलो.

कृष्णाला विचारलं की तुझ्या आणि एबनच्या नात्याला आई वडिलांची मंजूरी आहे का, यावर ती म्हणाली की, त्या दोघांना माझ्या जजमेंटवर विश्वास आहे आणि त्यांना त्यांची मुलं आनंदी पहायची आहेत. 

तिला लग्नाबाबत विचारलं असतं तिने सांगितलं की, अद्याप साखरपुडा किंवा लग्न करण्याचा विचार नाही. सध्या नात्याला पुढे पुढे नेत आहोत. आम्ही एकमेकांची कंपनी सध्या एन्जॉय करतो आहे. एगेंजमेंट करणार असू तेव्हा नक्कीच सांगू.

टॅग्स :जॅकी श्रॉफटायगर श्रॉफ