Join us  

कॉफी विथ करणमध्ये झळकणार अक्षय कुमार आणि रणवीर सिंग, अक्षयने कार्यक्रमात केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 1:06 PM

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या प्रोमोत अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांची धमाल मस्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. ते दोघांची खूप चांगली मैत्री असल्याचे या प्रोमातून आपल्याला दिसत आहे. ते दोघेही एकमकेांची टर उडवण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. या कार्यक्रमाचा नव्या सिझनचा पहिला भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या भागात प्रेक्षकांना दीपिका पादुकोण आणि आलिया भट यांना पाहायला मिळाले. या कार्यक्रमात त्यांनी या कार्यक्रमाचा सूत्रधार करण जोहरसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. त्यांच्या आयुष्यातील अनेक गुपिते देखील या कार्यक्रमात सांगितली. त्यानंतर आता या कार्यक्रमात प्रेक्षकांना कोण पाहायला मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आता अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांना पाहायला मिळणार आहे. 

कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रेक्षकांना खूप आवडला असल्याचे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. एवढेच नव्हे तर कॉफी विथ करण हा हॅशटॅग सुद्धा सोशल मीडियावर ट्रेंड झालेला आहे. कॉफी विथ करण 6 च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादानंतर आता या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. 

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या प्रोमोत अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांची धमाल मस्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. ते दोघांची खूप चांगली मैत्री असल्याचे या प्रोमातून आपल्याला दिसत आहे. ते दोघेही एकमकेांची टर उडवण्याची एकही संधी सोडत नाहीयेत असे प्रोमोत आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय रणवीरला बोलतोय की, रणवीर कोणाच्याही लग्नाला गेला की तिथून निघतच नाही. अनेकवेळा तर वधू आणि वर रणवीर कधी जाणार याची वाट पाहात असतात तर यावर उत्तर देताना रणवीर म्हणतो, पैसे वाया गेलेले अक्षयला आवडत नाहीत. त्यामुळे तो लोकांचे लग्न, संगीत, पार्टी यांच्यातदेखील डान्स करतो. एवढेच नव्हे तर दीपिका रणवीरसोबत राहाते यासाठी तिला मानले पाहिजे असे देखील या प्रोमात अक्षय बोलताना दिसत आहे. पण असे बोलल्यावर रणवीरचे जे काही एक्सप्रेशन आहेत ते नक्कीच पाहाण्यासारखे आहेत. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. 

टॅग्स :कॉफी विथ करण 6रणवीर सिंगअक्षय कुमारदीपिका पादुकोण