Join us

जेव्हा भर मैफिलित, गप्प जागेवर बस म्हणून होस्टनेच रणवीरला झापले, काय होतं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 14:24 IST

ऑनस्क्रीन अभिनयाने मनं जिंकलेला रणवीर खऱ्या आयुष्यातही अतिशय मनमौजी आहे. कधी त्याच्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे तो चर्चेत असतो तर कधी त्याचे वागणं जरा विचित्र असले तरी दिलखुलास असतो.

रणवीर सिंहने इडंस्ट्रीमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्याचा अभिनय आणि त्याचा हटके अंदाज पाहून चाहते फिदा होतात. ऑनस्क्रीन अभिनयाने मनं जिंकलेला रणवीर खऱ्या आयुष्यातही अतिशय मनमौजी आहे. कधी त्याच्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे तो चर्चेत असतो तर कधी त्याचे वागणं जरा विचित्र असले तरी दिलखुलास असतो. त्याचा अतिउत्साह हा प्रत्येक बाबतीत दिसून येतो. रणवीरचा हाच अतिउत्साह एकदा त्याला नडला होता.

अभिनेत्री इरा दुबेनेही रणवीरचे वागणे बघून त्याला सुनावले होते. खुद्द इरानेच या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीत केला होता.एका  पुरस्कार सोहळ्यात हा किस्सा घडला होता. कार्यक्रमात उपस्थित सगळेच अतिशय शांततेत कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. रणवीर मात्र वेगळ्याच धुंदीत होता. इकडून -तिकडे गोंधळ घालत होता. रणवीरचे असे वागणे पाहून इराची मात्र सटकली आणि सगळ्यांसमोर तिने गप्प एका जागी जागेवर बस म्हणून त्याला खडसावले होते.

या पुरस्कार सोहळ्याला होस्ट करण्याचे काम इराला देण्यात आले होते. इरा अक्षय आणि विवेकसह या सोहळ्याला होस्ट करत होती. कार्यक्रम सुरु होताच रणवीर एका टेबलवरून दुसऱ्या  टेबलवर जात सगळ्यांना भेटत होता. जोरजोराने ओरडत होता. त्याचे असे वागण्याने कार्यक्रमात उपस्थित इतरांनाही डिस्टर्ब होत होते. शेवटी त्याचे असे वागणं पाहून त्याला बोलणं भागचं होते. तो चांगला अभिनेता आहे. त्याचा स्वभावही सर्वांना माहिती आहे. त्याचा आदरही करते. पण कार्यक्रमात जे काही घडले त्यामुळे रणवीरलाही माझा राग आला असावा अशेही इराने सांगितले.

दीपिकासह लग्न झाल्यानंतर दीपवीर नावाने या जोडीला वेगळी ओळख मिळाली. दोघांची जोडीही प्रचंड चर्चेत असते. दोघांमध्येही चांगलीच केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळते. रणवीरचा मनमौजी अंदाजच दीपिकाला आवडला असावा आणि म्हणूनच जीवनसाथी म्हणून त्याची निवड केली असावी. दीपिकाही तितकीच मनमौजी असल्याचे पाहायला मिळते. रवणीर प्रमाणेच हटके स्टाईळ करत तीही सगळ्यांच्या नजरा वेधून घेताना दिसते.  

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोण