Join us

अभिनेत्री किरण खेर कोरोना पॉझिटिव्ह, ट्वीटच्या माध्यमातून लोकांना केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 09:29 IST

जगभरात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे.

जगभरात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत जे आता चिंतेचे कारण बनत चालले आहे. सेलिब्रिटीही कोरोना पॉझिटिव्ह येण्यास सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि संसदेच्या सदस्य किरण खेर (Kirron Kher) कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती शेअर केली. 

किरण खेर यांनी काल सोमवारी ट्वीट केले, 'मी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कृपया आपली चाचणी करुन घ्यावी.'

2021 मध्ये किरण खेर यांना मल्टिपल मायलोमा (ब्लड कॅन्सरचा एक प्रकार) चे निदान झाले होते. याचा खुलासा त्यांचे पती आणि अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियातून केला होता. स्क्रीनपासून एक वर्ष दूर राहिल्यानंतर उपचार पार पडल्यानंतर त्यांनी 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शो मधून जजच्या रुपात कमबॅक केले होते.

किरण खेर यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. 'देवदास','रंग दे बसंती','हम तुम','मै हु ना' सारख्या सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत. किरणजी लवकर बऱ्या होऊ दे म्हणून चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :किरण खेरबॉलिवूडकोरोना वायरस बातम्यासकारात्मक कोरोना बातम्या