Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानलं! साऊथ स्टार Kiccha Sudeep ३१ गायी दत्तक घेणार, म्हणाला...‘ही तर माझी जबाबदारी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 10:43 IST

साऊथ स्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) काही दिवसांपूर्वी त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत होता. आता तो एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. होय, किच्चा सुदीप 31 गायी दत्तक घेणार आहे.

साऊथ स्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep ) काही दिवसांपूर्वी त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत होता. आता तो एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. होय, किच्चा सुदीप 31 गायी दत्तक घेणार आहे. पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा 31 गायी तो दत्तक घेणार आहे.

गुरूवारी किच्चा सुदीपने कर्नाटकचे पशूसंवर्धन मंत्री प्रभु बी चौहान यांच्या निवासस्थानी गौ पूजा केली. यावेळी गायींच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने आरंभलेल्या कामाची त्याने प्रशंसा केली. राज्य सरकारने माझी पुण्यकोटी दत्तू योजनेच्या अ‍ॅम्बिसीडरपदी नियुक्ती केली, यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे, असं तो म्हणाला.

यावर्षाच्या सुरूवातीला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या वाढदिवशी 11 गायी घेतल्या. मंत्री प्रभु चव्हाण यांनीही 31 गायी दत्तक घेतल्याची घोषणा केली. हे पाहून मी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यातील एक गाय दत्तक घेणार असल्याचं किच्चा सुदीपने जाहिर केलं.

कर्नाटक राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर तब्बल 100 गोशाळा स्थापन झाल्या आहेत. पुण्यकोटी दत्तू योजना राबवणारं कर्नाटक हे देशातील पहिलं राज्य आहे. याअंतर्गत पशु कल्याण मंडळ, पशु हेल्पलाईन केंद्र, पशु संजीवनी रूग्णवाहिका, गोमाता सहकारी संस्था, आत्मनिर्भर गोशाळा असे अनेक उपक्रम राबवले जाणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गाईच्या देखभालीसाठी दरवर्षी 11 हजार रूपये देण्यात येईल.

किच्चा सुदीप हे आज कन्नड सिनेमाचं मोठं नाव आहे. किच्चा सुदीपने केवळ कन्नडच नाही तर तामिळ, तेलगू, हिंदी सिनेमातही काम केलं.आज जगभरातील चाहते सुदीपला किच्चा सुदीप याचं नावाने ओळखतात. पण सुदीपचं खरं नाव सुदीप संजीव आहे. 1997 साली थैवा या चित्रपटात तो मुख्य अभिनेता म्हणून झळकला. पण त्याला खरी ओळख दिली ती ईगा अर्थात मक्खी या चित्रपटाने. त्याचा हा चित्रपट तुफान गाजला.

बॉलिवूडमध्येही किच्चाने काम केलं. किच्चा सुदीप आणि सलमान खान हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. या दोघांनी  दबंग 3  सिनेमात एकत्र काम केलं. किच्चा सुदीपनं सलमानच्या या चित्रपटासाठी एकही रुपयाचं मानधन घेतलं नव्हतं.

टॅग्स :Tollywood