Join us

समोर आलं कियारा आडवाणीच्या परफेक्ट बिकिनी लुकचं सिक्रेट, 'अशी' घेतली मेहनत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:06 IST

सध्या सगळीकडे कियाराच्या बिकिनी लूकची तुफान चर्चा आहे. 

Kiara Advani's "War 2" Bikini Look: बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आपल्या ग्लॅमरस स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असते. कियारा लवकरच 'वॉर २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा २० मे रोजी टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये कियारा बिकिनी लूकमध्ये दिसली. सध्या सगळीकडे तिच्या हॉट अशा बिकिनी लूकची तुफान चर्चा आहे. 

कियारा ही नियॉन लाइम ग्रीन रंगाच्या बिकीनीमध्ये कमालीची सुंदर आणि हॉट दिसली असून तिचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. कियाराने चित्रपटात बिकिनी घालण्याची ही पहिलीच वेळ होती. हा आयकॉनिक लूक कसा मिळवला याबद्दल  प्रसिद्ध स्टायलिस्ट अनाइता श्रॉफ अदजानिया यांनी सांगितलं. कियाराच्या या लूकविषयी अनाइता म्हणाल्या,"हे माझं कियारासोबतचं पहिलं फिल्म कोलॅबरेशन होतं. हॉट लूक हवाय, हे स्पष्ट होतं.  मी आधीही बऱ्याच चित्रपटांत स्विमसूट्स स्टाईल केले आहेत, पण यावेळी मला कियारासाठी अगदी नैसर्गिक लूक हवा होता".

कियाराच्या बिकीनी लूकसाठी नियॉन लाइम ग्रीन रंग का निवडला, याबद्दलही अनाइता श्रॉफ अदजानिया यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, "मी तिच्यासाठी एक अनपेक्षित रंग निवडला. ना अगदी हिरवा, ना अगदी पिवळा. बिकिनी डिझाइन साधं ठेवण्यात आलं होतं, पण त्यात एक ट्विस्ट जोडण्यात आला. आम्ही बिकिनी चार्म्स वापरले, जे मध्यभागी ठेवण्यात आले. या डिझाइनमुळे बिकिनी आणखी सुंदर झाली".

शूटिंगवेळीचा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या,  "मी तिला सारखं म्हणत होते, जशी आहेस, तशी राहा, काही देखावा करण्याची गरज नाही". कियारा फिटनेसबाबत खूप मेहनत घेत असल्याचंही अनाइता यांनी नमूद केलं. त्या म्हणाल्या, "हा लूक इतका ग्लॅमरस दिसतोय. कारण तिने त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. ती इतकी सहज होती की तिला काही विचार करावा लागला नाही. ती जशी आहे, तशीच दिसली. त्या शरीराचं श्रेय फक्त तिलाच जातं." दरम्यान, कियारा ही लवकरच आई होणार आहे.  अलीकडेच कियारानं मेट गाला २०२५ मध्ये तिच्या बेबी बंपसह एन्ट्री घेतली होती. 

टॅग्स :कियारा अडवाणीबॉलिवूड