Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आई झाल्यानंतर मी आधीपेक्षा जास्त...;" कियारा अडवाणीने सांगितला मातृत्वाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 12:24 IST

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. आई झाल्यानंतर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नेमके काय बदल झाले, याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणाने भाष्य केले आहे

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. आई झाल्यानंतर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नेमके काय बदल झाले, याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणाने भाष्य केले आहे. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या घरी काही महिन्यांपूर्वी एका चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. त्यानंतर कियाराचे आयुष्य कसे बदलले, याचा खुलासा तिने केला आहे.

ग्राज़िया इंडियाच्या मुलाखतीत कियारा म्हणाली की, "आई होणे हा जगातील सर्वात सुंदर अनुभव आहे. या अनुभवाने मला अधिक संयमी आणि शांत बनवले आहे. पूर्वी माझे संपूर्ण लक्ष माझ्या कामावर आणि करिअरवर असायचे, पण आता माझा प्राधान्यक्रम पूर्णपणे बदलला आहे. आता माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट माझ्या मुलीच्या हसण्याने होतो."

कियाराने मान्य केले की, कामासोबतच बाळाची जबाबदारी सांभाळणे थोडे आव्हानात्मक आहे, पण सिद्धार्थची यात मोठी मदत मिळते. "सिद्धार्थ एक उत्तम बाबा आहे आणि आम्ही दोघे मिळून सर्व गोष्टींचे नियोजन करतो. आता शूटिंगच्या सेटवर असतानाही माझे मन सतत घरी असते. मला वेळेचे महत्त्व पूर्वीपेक्षा जास्त जाणवू लागले आहे," असेही तिने नमूद केले. याशिवाय मुलीच्या जन्मानंतर 'और भी ज्यादा शेरनी बन गई हू' असंही कियारा म्हणाली.

कियारा आणि सिद्धार्थने अद्याप आपल्या मुलीचा चेहरा सोशल मीडियावर उघड केलेला नाही, मात्र कियाराने शेअर केलेल्या या अनुभवांमुळे तिचे चाहते खूप आनंदी आहेत. आई झाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच Glow दिसत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. आई झाल्यानंतरही कियाराने आपल्या कामाकडे दुर्लक्ष केलेले नाही. ती लवकरच काही मोठ्या प्रकल्पांमध्ये दिसणार आहे. कियाराचा यशसोबतचा 'टॉक्सिक' सिनेमा जून २०२६ ला रिलीज होणार आहे. मात्र, आता ती चित्रपटांची निवड करताना आपल्या कौटुंबिक वेळेचा विचार करूनच निर्णय घेत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kiara Advani: Motherhood made me more patient, prioritizes family.

Web Summary : Kiara Advani shares her experience of motherhood, stating it brought patience and shifted her priorities to family. She balances work with Siddharth's support. Kiara feels more empowered after her daughter's birth and carefully chooses film projects now.
टॅग्स :कियारा अडवाणीबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकारसिद्धार्थ मल्होत्रा