Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hotness Alert! कियारा अडवाणीचा साडीतील बोल्ड लूक पाहून फॅन्स घायाळ, म्हणाले- 'उफ्फ ये अदा...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 12:55 IST

पुन्हा एकदा कियारा अडवाणीचा साडीतील बोल्ड लूक बघून तिचे फॅन्स तिच्या अधिक जास्त प्रेमात पडले आहेत.

यात काहीही दुमत नाही की, बॉलिवूड अभिनेत्री काळानुसार आपल्या कपड्यांची स्टाइल बदलत असतात. आता बी-टाउनमधील स्वप्न पऱ्या आपली स्टाइल कायम ठेवण्यासाठी झगमगाट असलेले कपडे वापरू लागल्या आहेत. हे असे कपडे आहेत जे कॅरी करताना सर्वसामान्य महिलांना दहा वेळा विचार करावा लागेल. असंच काहीसं नुकतंच कियारा अडवाणीसोबत बघायला मिळालं.

अनेक दिग्गज फॅशन डिझायनरच्या कपड्यांना चार चांद लावणाऱ्या कियाराबाबत हे सर्वांनाच नाही आहे की, कियारा एथनिक पासून ते वेस्टर्न सिल्हूट्सला चांगल्याप्रकारे कॅरी करण्यात तरबेज आहे. नेहमीच आपल्या सिंपल लूक्सने फॅन्सना वेड लावणाऱ्या कियाराला मनीष मल्होत्राच्या बोल्ड साडीत बघितल्यावर तर अनेकांना घाम फुटला आहे.

कियाराने तिच्या आगामी 'इंदू की जवानी' सिनेमातील ''हीलें टूट गयी' गाण्यात फेमस डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली गोल्डन सीक्वेंस प्री-स्टिच्ड साडी निवडली. यात ती कमालीची सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. कियारा अडवाणीचे आतापर्यंतचे अनेक बोल्ड फोटो तुम्ही पाहिले असतील, पण या हॉट साडीतील तिच्या लूकने अनेकांची बोलती बंद झाली आहे. 

जसा हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला. तिचे फॅन्स भरभरून कमेंट्स करू लागले. काही तिचा हा फोटो पाहून 'जहर', उफ्फ उफ्फ', 'हॉट' सारख्या कमेंट करू लागले आहेत. तर काहींना कियाराचा हा अंदाज पसंत पडला नाही. खरंतर ही पहिली वेळ नाही की, कियाराने साडीतील लूकने फॅन्सना वेड लावलं. याआधीही अर्पिता मेहताने डिझाइन केलेली साडी नेसून तिने धमाका केला होता. 

टॅग्स :कियारा अडवाणीबॉलिवूडसोशल मीडिया